मुंबई

स्थायी समितीत वाढीव भत्त्याचा प्रस्ताव मंजूर

CD

स्थायी समितीत वाढीव भत्त्याचा प्रस्ताव मंजूर
पेढे वाटून मनसेचा जल्लोष
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १५ ः पालिकेच्या महासभेने मंजूर केलेल्या ठरावानुसार सेवा-आधारित कंत्राटी कर्मचाऱ्यांना दरमहा ७,५०० रुपये ‘नागरी सेवा संचालन विशेष भत्ता’ देण्याचा प्रस्ताव अखेर बुधवारी (ता. १५) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेना आणि मनसेच्या वतीने केलेल्या आक्रमक आंदोलन केले होते. मनसेच्या या यशस्वी लढ्यानंतर पालिका मुख्यालयासमोर पेढे वाटून व फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला.
पालिकेच्या महासभेने कंत्राटी कर्मचाऱ्यांना विशेष भत्ता देण्याचा निर्णय घेतला होता, मात्र ठराव मंजूर होऊन बराच कालावधी उलटूनही त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला होता. या पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे, नवी मुंबई मनसे शहराध्यक्ष गजानन काळे तसेच कामगार नेते अप्पासाहेब कोठुळे व राजेश उज्जैनकर यांच्या नेतृत्वात शेकडो कर्मचाऱ्यांनी पालिका मुख्यालयावर धडक देत ‘टोप्या घाला’ आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिलेल्या आश्वासनानुसार प्रशासनाने स्थायी समितीत हा प्रस्ताव मांडून त्याला मंजुरी मिळवून दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Social Media Backlash : "व्ह्यूजसाठी इतक्या खालच्या पातळीला..."; पत्नीला पाळीव कुत्र्याच्या भांड्यातून पाणी पाजले, यूट्यूबर सौरभ जोशीवर नेटकरी भडकले!

Jailer 2 Movie Review : रजनीकांतच्या 'जेलर २'चा प्रेक्षकांवर प्रभाव कसा? वाचा रिव्ह्यू

Latest Marathi News Update: कॅफेबाहेर खुनाचा प्रयत्न करून पसार झालेल्या आरोपीला अटक

Hingoli District Earthquake : हिंगोली जिल्ह्याला पुन्हा भूकंपाचा धक्का, रिश्टर स्केलवर २.९ तीव्रतेची नोंद

IND vs WI : अर्शदीप सिंग पाचव्या T20I मधून बाहेर गेला, तर त्याची जागा कोण घेणार; ३६ वर्षीय गोलंदाजाच्या कमबॅकची तुफान चर्चा

SCROLL FOR NEXT