मुंबई

उन्हाचा तडाखा; आरोग्य सांभाळा

CD

उन्हाचा तडाखा; आरोग्य सांभाळा
उष्माघातापासून बचावासाठी पनवेल महापालिकेचे आवाहन
पनवेल, ता. १५ (बातमीदार) : गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ होत असल्याने उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन पनवेल पालिकेने केले आहे. कडक उन्हात बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि उष्णतेशी संबंधित लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी, असे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी सांगितले.
वाढत्या तापमानामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन चक्कर येणे, मळमळ, उलटी आणि अशक्तपणा यांसारखे त्रास होऊ शकतात. त्यामुळे शक्यतो दुपारच्या कडक उन्हात बाहेर जाणे टाळावे. बाहेर पडताना टोपी, छत्री आणि गॉगलचा वापर करावा. हलक्या रंगाचे, सैल आणि सुती कपडे परिधान करावेत. प्रवासादरम्यान पाण्याची बाटली सोबत ठेवून नियमितपणे पाणी प्यावे.
लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि उन्हात काम करणाऱ्या व्यक्तींनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. बाहेरील कामे शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी करावीत. कामाच्या दरम्यान नियमित विश्रांती घ्यावी आणि शरीरात पाण्याची कमतरता होऊ देऊ नये. उष्माघाताची लक्षणे जाणवल्यास जवळच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करून घ्यावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

आहाराकडेही लक्ष द्या
उन्हाळ्यात आहारात फळे, पालेभाज्या आणि पाण्याचे प्रमाण अधिक असलेल्या पदार्थांचा समावेश करावा. पाणी नियमित प्यावे. चहा, कॉफी आणि कॅफिनयुक्त पेयांचे अतिसेवन टाळावे. तळलेले तसेच शिळे अन्न खाणे टाळून शरीरातील पाण्याचे संतुलन राखावे.

गंभीर लक्षणे दिसल्यास तातडीने उपचार
तीव्र डोकेदुखी, चक्कर, उलटी, स्नायूंमध्ये आकडणे, गोंधळल्यासारखे वाटणे किंवा शरीराचे तापमान खूप वाढणे ही उष्माघाताची गंभीर लक्षणे असू शकतात. अशी लक्षणे दिसल्यास संबंधित व्यक्तीला तातडीने सावलीत किंवा थंड ठिकाणी न्यावे, शरीर थंड करण्यासाठी ओल्या कापडाचा वापर करावा आणि वैद्यकीय मदत घ्यावी. व्यक्ती बेशुद्ध असल्यास किंवा गोंधळलेल्या अवस्थेत असल्यास तोंडाने पाणी किंवा अन्य पदार्थ देऊ नयेत. तातडीने रुग्णवाहिका किंवा वैद्यकीय मदत घ्यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Social Media Backlash : "व्ह्यूजसाठी इतक्या खालच्या पातळीला..."; पत्नीला पाळीव कुत्र्याच्या भांड्यातून पाणी पाजले, यूट्यूबर सौरभ जोशीवर नेटकरी भडकले!

Jailer 2 Movie Review : रजनीकांतच्या 'जेलर २'चा प्रेक्षकांवर प्रभाव कसा? वाचा रिव्ह्यू

Latest Marathi News Update: कॅफेबाहेर खुनाचा प्रयत्न करून पसार झालेल्या आरोपीला अटक

Hingoli District Earthquake : हिंगोली जिल्ह्याला पुन्हा भूकंपाचा धक्का, रिश्टर स्केलवर २.९ तीव्रतेची नोंद

IND vs WI : अर्शदीप सिंग पाचव्या T20I मधून बाहेर गेला, तर त्याची जागा कोण घेणार; ३६ वर्षीय गोलंदाजाच्या कमबॅकची तुफान चर्चा

SCROLL FOR NEXT