मुंबई

कालव्याच्या दुरूस्तीची मागणी

CD

कालव्याच्या दुरुस्तीची मागणी
डिसेंबरअखेर पाणी न सोडल्यास बळीराजा फाउंडेशनचा आंदोलनाचा इशारा
रोहा, ता. १५ (बातमीदार) : आंबेवाडी ते निवी कालव्याची दुरुस्ती व साफसफाई तातडीने करून डिसेंबरअखेर पाणीपुरवठा पूर्ववत करावा, या मागणीसाठी बळीराजा फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी कोलाड पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले. कालव्याच्या दुरुस्तीची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत, तसेच निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. मागण्यांची पूर्तता न झाल्यास आंदोलनासह अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा इशारा फाउंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी दिला.
संभे, पाले आदी भागांत कालव्याच्या अस्तरीकरणाची (लायनिंग) कामे अपूर्ण असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याचे फाउंडेशनने निदर्शनास आणून दिले. ही कामे तातडीने पूर्ण करावीत, तसेच बारसोली गावातील ड्रेनेजच्या साफसफाईचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली. कालव्याच्या सर्व कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
या वेळी अध्यक्ष विठ्ठल मोरे, संस्थापक राजेंद्र जाधव, सचिव ॲड. दीपक भगत, उपाध्यक्ष तुकाराम भगत, महेश कांबळे, शरद जाधव, जितेंद्र जाधव, भूषण मोरे यांच्यासह फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
कोलाड पाटबंधारे विभागाच्या आंबेवाडी ते निवी कालव्याच्या पाण्यासाठी बळीराजा फाउंडेशनच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच ते सहा वर्षांपासून शेतकरी सातत्याने आंदोलन करीत आहेत. मागील दोन वर्षांपासून कालव्याला अंशतः पाणी सोडण्यात आल्याने परिसरातील शेतीला दिलासा मिळाला. भाजीपाला व पोल्ट्री व्यवसायाला चालना मिळाली, तर विहिरी आणि बोअरवेलमधील पाणीसाठाही टिकून राहण्यास मदत झाली. यापूर्वी या पाण्यासाठी मोर्चे, उपोषणे आणि आंदोलने करावी लागली होती. आता कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या कालव्याचे पाणी नियमितपणे मिळावे, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
फाउंडेशनचे संस्थापक राजेंद्र जाधव यांनी, पाणी आमच्या हक्काचे आहे. त्यासाठी शासनाने कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे कालव्याचे पाणी कोणीही रोखू शकत नाही. डिसेंबरअखेर पाणी सोडले नाही, तर आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला.


महिनाभरात दुरुस्तीची कामे
सोमवारपासून कालव्याच्या साफसफाईला सुरुवात करण्यात येईल. महत्त्वाची दुरुस्तीची कामे महिनाभरात पूर्ण करण्याचे नियोजन असून, डिसेंबरअखेर कालव्याला पाणी सोडण्यात येईल,” अशी माहिती कोलाड पाटबंधारे विभागाचे उपअभियंता सचिन कदम यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Social Media Backlash : "व्ह्यूजसाठी इतक्या खालच्या पातळीला..."; पत्नीला पाळीव कुत्र्याच्या भांड्यातून पाणी पाजले, यूट्यूबर सौरभ जोशीवर नेटकरी भडकले!

Jailer 2 Movie Review : रजनीकांतच्या 'जेलर २'चा प्रेक्षकांवर प्रभाव कसा? वाचा रिव्ह्यू

Latest Marathi News Update: कॅफेबाहेर खुनाचा प्रयत्न करून पसार झालेल्या आरोपीला अटक

Hingoli District Earthquake : हिंगोली जिल्ह्याला पुन्हा भूकंपाचा धक्का, रिश्टर स्केलवर २.९ तीव्रतेची नोंद

IND vs WI : अर्शदीप सिंग पाचव्या T20I मधून बाहेर गेला, तर त्याची जागा कोण घेणार; ३६ वर्षीय गोलंदाजाच्या कमबॅकची तुफान चर्चा

SCROLL FOR NEXT