मुंबई

युनूस शेख यांनी शिंदे सेनेतील प्रवेशाची चर्चा फेटाळली

CD

शिंदे सेनेतील प्रवेशाची चर्चा युनूस शेख यांनी फेटाळली
ठाणे, ता. १५ : एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांचे वडील युनूस शेख यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याची चर्चा सुरू झाली आहे; मात्र, आपण कोणत्याही पक्षात प्रवेश केला नसून एमआयएममध्येच असल्याचे युनूस शेख यांनी स्पष्ट केले आहे.
ठाणे महापालिका निवडणुकीत मुंब्रा येथील प्रभाग क्रमांक ३० मधून सहर शेख या एमआयएमच्या तिकिटावर निवडून आल्या. विजयानंतर केलेल्या भाषणात त्यांनी, ‘कैसा हराया, अभी हमलोगों को मुंब्रा को पूरा हरा कर देना है,’ असे वक्तव्य करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना लक्ष्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचे राजकीय पडसाद उमटले होते. या पार्श्वभूमीवर युनूस शेख यांना कळवा-मुंब्रा केबल सेनेचे अध्यक्षपद देण्यात आल्याने त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत चर्चा सुरू झाली. नियुक्तीपत्रात एकनाथ शिंदे यांच्या आदेशाचा उल्लेख असल्याने शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याच्या चर्चेला अधिक बळ मिळाले; मात्र, युनूस शेख यांनी पक्षप्रवेशाची शक्यता फेटाळून लावली.
...
‘मी एमआयएममध्येच’
“मी गेल्या ४० वर्षांपासून केबल व्यवसायात आहे. दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांनी स्थापन केलेल्या अखिल भारतीय केबल सेनेचा मी सदस्य आहे. संघटनेने कळवा-मुंब्रा विभागाची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. या माध्यमातून परिसरातील केबल आणि इंटरनेट व्यवसायाशी संबंधित कामे पाहणार आहे. माझा शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश झालेला नाही. मी एमआयएममध्येच आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सीजेपीच्या 'तिरंगा मार्च'ला आडकाठी! दिल्लीतील सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा निर्णय; अभिजित दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, '100 ठिकाणी...'

Drunk and Driver : कोथरूडमध्ये ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’चा थरार; तीन ते चार जण किरकोळ जखमी, २४ वर्षीय कारचालक विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

Mangalwedha News : मंगळवेढा तालुक्यात 4777 कुटुंबाचे धान्य ऐन दुष्काळात बंद

Manchar Water Issue : आंबेगाव तालुक्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईवर तातडीने नियोजन करा; प्रांताधिकारी अर्चना तांबे यांचे अधिकाऱ्यांना आदेश

PM नरेंद्र मोदींना भेटले Asiad पदकविजेते भारतीय खेळाडू, वैभव सूर्यवंशीच्या रिअॅक्शनचा Video होतोय Viral

SCROLL FOR NEXT