ठाणे, ता. १५ : शुद्धता, गुणवत्ता आणि ग्राहकांच्या विश्वासाची ९३ वर्षांची परंपरा जपणाऱ्या ‘एम. के. घारे ज्वेलर्स’ने ठाणे पश्चिम येथील राम मारुती रोडवरील राजश्री आणि भाग्यश्री सोसायटी लिमिटेडच्या शोरूम नंबर ६ येथे आपले नववे दालन सुरू केले आहे. या नव्या दालनातून ग्राहकांना पारंपरिक कलाकुसरीपासून आधुनिक शैलीतील दागिन्यांपर्यंत विविध पर्याय उपलब्ध होणार आहेत.
१९३३ पासून दागिन्यांच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या एम. के. घारे ज्वेलर्सने आपल्या परंपरेतून ग्राहकांशी विश्वासाचे नाते जपले आहे. दर्जेदार सेवा, शुद्धतेची खात्री आणि आकर्षक दागिन्यांच्या विविधतेच्या बळावर ग्राहकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. या नव्या दालनाच्या माध्यमातून हा सुवर्णवारसा अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा कंपनीचा मानस आहे. या दालनात सोन्याचे, चांदीचे आणि हिऱ्यांचे दागिने, दैनंदिन वापरासाठी हलके अलंकार, पारंपरिक दागिने तसेच आधुनिक रचनांतील दागिन्यांचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. लग्नसमारंभांसाठी खास दागिन्यांचे कलेक्शन येथे पाहता येणार आहे. पारंपरिक कलाकुसर आणि आधुनिक शैली यांचा मेळ साधणारे दागिने सर्व वयोगटांतील ग्राहकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरेल. ‘९३ वर्षांचा विश्वास… प्रत्येक नातं सोन्यासारखं खास!’ हे ब्रीद जपत एम. के. घारे ज्वेलर्सने नव्या दालनाच्या माध्यमातून ग्राहकांशी असलेले नाते अधिक दृढ करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.