मुंबई

नालासोपारा लैंगिक अत्याचार प्रकरण: विशेष तपास पथक स्थापन

CD

लैंगिक अत्याचार प्रकरणी विशेष तपास पथक
नालासोपारा, ता. १५ (बातमीदार) : लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास आता विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) केला जाणार आहे. डेटिंग ॲपच्या माध्यमातून मुलींशी मैत्री करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आणि अश्लील चित्रफिती तयार करून त्या परदेशात पाठवल्याचा आरोप आरीफ शेख याच्यावर आहे. आतापर्यंत चार तरुणींनी त्याच्याविरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन एसआयटी स्थापन करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी गुरुवारी (ता. १५) दिली.

नालासोपारा येथील हनुमान नगरमध्ये राहणाऱ्या आरिफ शेख (वय २२) याने डेटिंग ॲपद्वारे तरुणींशी मैत्री करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे आणि त्यांच्या अश्लील चित्रफिती तयार केल्याचे तपासात समोर आले आहे. आतापर्यंत चार तरुणींनी त्याच्याविरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यापैकी एक पीडिता अल्पवयीन असल्याने तिच्या तक्रारीवरून बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (पोक्सो) गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आणखी पीडिता पुढे येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
......
पोलीस आयुक्तांकडून आरोपीची चौकशी
पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी गुरुवारी नालासोपारा पोलीस ठाण्याला भेट देऊन आरोपीची स्वतः चौकशी केली. प्रकरणाची व्याप्ती आणि तपासाचे गांभीर्य लक्षात घेऊन स्वतंत्र एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त या पथकाचे प्रमुख असतील. तसेच पथकात कायदेविषयक सल्लागार, तंत्रज्ञानविषयक अधिकारी आणि अन्य कर्मचाऱ्यांचा समावेश असेल, असे कौशिक यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सीजेपीच्या 'तिरंगा मार्च'ला आडकाठी! दिल्लीतील सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा निर्णय; अभिजित दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, '100 ठिकाणी...'

Drunk and Driver : कोथरूडमध्ये ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’चा थरार; तीन ते चार जण किरकोळ जखमी, २४ वर्षीय कारचालक विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

Mangalwedha News : मंगळवेढा तालुक्यात 4777 कुटुंबाचे धान्य ऐन दुष्काळात बंद

Manchar Water Issue : आंबेगाव तालुक्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईवर तातडीने नियोजन करा; प्रांताधिकारी अर्चना तांबे यांचे अधिकाऱ्यांना आदेश

PM नरेंद्र मोदींना भेटले Asiad पदकविजेते भारतीय खेळाडू, वैभव सूर्यवंशीच्या रिअॅक्शनचा Video होतोय Viral

SCROLL FOR NEXT