मुंबई

नवरात्रोत्सवासाठी बेकायदा वीजजोडणीमुळे शॉर्टसर्किट

CD

नालासोपारा इमारत आग प्रकरण
नवरात्रोत्सवासाठी बेकायदा वीजजोडणीमुळे शॉर्टसर्किट
नालासोपारा, ता. १५ (बातमीदार) : आचोळे येथील इम्पिरियल हेरिटेज इमारतीतील आगीच्या दुर्घटनेचे प्राथमिक कारण समोर आले आहे. सोसायटीत नवरात्रोत्सवासाठी बेकायदा वीजजोडणी घेतल्याने अतिरिक्त भार पडून शॉर्टसर्किट झाले आणि आग लागल्याची माहिती वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन विभागाने दिली. या दुर्घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला असून, सहा जण जखमी झाले आहेत.
नालासोपारा-वसई लिंक रोडवरील इम्पिरियल हेरिटेज इमारतीच्या बी विंगमधील १३व्या मजल्यावर मंगळवारी रात्री आग लागली होती. या आगीत फाल्गुनी शहा आणि अश्विनी पारकर यांचा मृत्यू झाला. अग्निशमन दलाने घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. सोसायटीत नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी चुकीच्या पद्धतीने वीजजोडणी घेण्यात आल्याने अतिरिक्त भार पडला आणि शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याचे अग्निशमन विभागाच्या तपासात समोर आले आहे. या आगीत दोन घरे पूर्णपणे जळाली, तर अन्य २० घरांचे अंशतः नुकसान झाले. अशी माहिती वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे प्रमुख रोहन मोरे यांनी दिली. दरम्यान, या घटनेप्रकरणी आचोळे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी विकासकाला नोटीस बजावली असून, रहिवाशांकडूनही खुलासा मागवला आहे. आगीचे नेमके कारण आणि घटनेची जबाबदारी निश्चित करण्यासाठी तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुजितकुमार पवार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

cctv video: जामनेर तालुक्यात भीषण अपघात! एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू, ट्रक चालक ताब्यात

FDA Blood Donation Rules : रक्तदान शिबिरांबाबत आयुक्त तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय!

IND vs NZ: बुमराह नसेल, तर त्याच्या जागी न्यूझीलंडविरुद्ध ODI मालिकेत कोणाची वर्णी लागणार? शमीसह तीन खेळाडूंचे पर्याय

Manoj Jarange On Farmer Relief : "५ हजारांसाठी शेतकऱ्यांनी बँकेच्या रांगेत मरायचं का?"; मनोज जरांगेंचा सरकारवर थेट हल्लाबोल, म्हणाले...

Latest Marathi News Update: कोथरुडमध्ये मद्यधुंद तरुणाची बेदरकारपणे ड्रायव्हिंग

SCROLL FOR NEXT