मुंबई

वसई-विरारमध्ये सात बोगस डॉक्टरांवर गुन्हे

CD

वसई-विरारमध्ये सात बोगस डॉक्टरांवर गुन्हे
नालासोपारा, ता. १५ (बातमीदार) : वसई-विरार शहरात बोगस डॉक्टरांविरोधात महापालिकेच्या आरोग्य विभागाने कारवाई सुरू केली आहे. पाच भरारी पथकांनी छापे टाकून सात बोगस डॉक्टरांविरोधात गुन्हे दाखल केले असून, त्यांचे दवाखाने सील केले आहेत. याबाबतची माहिती गुरुवारी (ता. १५) आरोग्य सभापती नीलेश देशमुख यांनी दिली.
सुकांत नायक, राकेश ब्रह्मादिन ऊर्फ वेदजी उपाध्याय, अनिल यादव, दीनानाथ यादव आणि प्रदीपकुमार पटेल या पाच जणांविरोधात तुळिंज पोलिस ठाण्यात, तर ब्रिजकिशोर रामलखन सिंग आणि अमन ब्रिजकिशोर सिंग या दोघांविरोधात वालीव पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नालासोपारा येथे चुकीचे इंजेक्शन दिल्यामुळे आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला होता. संबंधित डॉक्टर बोगस असल्याची माहिती समोर आल्यानंतर अशा घटना रोखण्यासाठी महापालिकेने पाच भरारी पथके स्थापन करून तपासणी सुरू केली. या पथकांनी नालासोपारा पूर्व परिसरात पाच, तर वसई पूर्व परिसरात दोन ठिकाणी छापे टाकले. संबंधित डॉक्टरांनी कथितरीत्या बोगस कागदपत्रांच्या आधारे दवाखाने सुरू केल्याचे तपासात समोर आले.

वसई आणि नालासोपारा पूर्व परिसरातील चाळी तसेच गरीब वस्त्यांमध्ये नागरिकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन बोगस डॉक्टरांकडून उपचार केले जात असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. अशा डॉक्टरांवर महापालिकेची नजर असून, नागरिकांनी उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या पात्रतेची खातरजमा करावी किंवा महापालिकेच्या अधिकृत रुग्णालयांत उपचार घ्यावेत, असे आवाहन आरोग्य सभापती नीलेश देशमुख यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

cctv video: जामनेर तालुक्यात भीषण अपघात! एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू, ट्रक चालक ताब्यात

FDA Blood Donation Rules : रक्तदान शिबिरांबाबत आयुक्त तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय!

IND vs NZ: बुमराह नसेल, तर त्याच्या जागी न्यूझीलंडविरुद्ध ODI मालिकेत कोणाची वर्णी लागणार? शमीसह तीन खेळाडूंचे पर्याय

Manoj Jarange On Farmer Relief : "५ हजारांसाठी शेतकऱ्यांनी बँकेच्या रांगेत मरायचं का?"; मनोज जरांगेंचा सरकारवर थेट हल्लाबोल, म्हणाले...

Latest Marathi News Update: कोथरुडमध्ये मद्यधुंद तरुणाची बेदरकारपणे ड्रायव्हिंग

SCROLL FOR NEXT