मुंबई

दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठांत गर्दी;

CD

दिवाळीत वाहतूक नियोजनावर भर
उल्हासनगर, ता. १६ (वार्ताहर) : दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी, बेशिस्त पार्किंग आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उल्हासनगर पोलिस प्रशासनाने विशेष नियोजन सुरू केले आहे. नेहरू चौक, गजानन मार्केट आणि गोल मैदान परिसरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिस आणि रिक्षा संघटनांमध्ये समन्वय साधण्यात येणार आहे. नागरिकांना खरेदीदरम्यान गैरसोय होऊ नये, तसेच बाजारपेठांमधील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी उपाययोजनांवर भर देण्यात आला आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगर-१ वाहतूक विभागात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. नवनियुक्त सहाय्यक पोलिस आयुक्त सिद्धार्थ गाडे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत उल्हासनगर-२ मधील प्रमुख बाजारपेठांतील वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. सणासुदीच्या काळात खरेदीसाठी मोठ्या संख्येने नागरिक बाजारपेठांमध्ये येतात. त्यामुळे रस्त्यांवर वाहनांची गर्दी वाढून वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असते. ही परिस्थिती टाळण्यासाठी पार्किंग व्यवस्था आणि वाहतुकीचे नियोजन करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
बाजारपेठांमध्ये येणाऱ्या नागरिकांना वाहन पार्किंगसाठी योग्य सुविधा उपलब्ध करून देणे, रस्त्यांवरील बेशिस्त पार्किंग रोखणे आणि गर्दीच्या ठिकाणी वाहतुकीचे व्यवस्थापन करणे, या मुद्द्यांवर बैठकीत भर देण्यात आला. वाहतूक कोंडीमुळे व्यापारी, वाहनचालक आणि खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासन आणि रिक्षा संघटनांनी परस्पर समन्वयातून काम करण्याचे ठरवले.
बैठकीला वरिष्ठ पोलिस निरीक्षक युवराज सरनोबत, रिक्षा युनियनचे अध्यक्ष हरजिंदर सिंह ऊर्फ विक्की भुल्लर, कार्याध्यक्ष रमेश सिंह, उपाध्यक्ष राहुल पाल, विभागप्रमुख प्रमोद पांडे आणि शहीद मारुतीराव जाधव रिक्षाचालक-मालक युनियनचे उपाध्यक्ष भूषण वैराळकर उपस्थित होते. यावेळी विक्की भुल्लर यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त सिद्धार्थ गाडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
दिवाळीत बाजारपेठांमधील वाहतूक सुरळीत ठेवून नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी पोलिस प्रशासन आणि रिक्षा संघटनांमधील समन्वय महत्त्वाचा ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs ZIM W: नव्या पर्वाची सुरुवात पण स्मृती मंधाना आणि झिम्बाब्वेच्या खेळाडू हाताला काळी पट्टी बांधून मैदानावर का उतरले? नेमकं काय घडलं?"

Raju Shetty : केंद्र सरकारचे नाक दाबण्यासाठी साखर उत्पादन बंद करा; राजू शेट्टी यांचे आवाहन

Elon Musk: ''मी कोणत्याही गोऱ्या व्यक्तीला देशाच्या निर्णयात हस्तक्षेप करू देणार नाही''; इलॉन मस्क वादावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले?

Delhi Protest High Drama : 'तिरंगा मार्च' सुरू होण्यापूर्वी अवघ्या १० मिनिटे आधी मोठी कारवाई! सीजेपी प्रमुख अभिजीत दिपकेंना दिल्ली पोलिसांकडून पुन्हा ताब्यात

Marathi News Live Updates: शहरात १०% पाणीकपात, तरीही टँकरने धुतले BRT चे डिव्हायडर; नागरिकांमधून संताप

SCROLL FOR NEXT