मुंबई

वडखळ-अलिबाग राज्यमार्गावर अंधाराचे साम्राज्य

CD

वडखळ-अलिबाग राज्य मार्गावर अंधाराचे साम्राज्य
पथदिव्यांच्या अभावामुळे रात्री प्रवास धोकादायक; नागरिकांकडून उपाययोजनांची मागणी
पोयनाड, ता. १६ (बातमीदार) : अलिबागला जोडणाऱ्या वडखळ-अलिबाग राज्य मार्गावर रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य असते. अनेक ठिकाणी पथदिवे नसल्याने वाहनचालक, दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. अपघातांचा धोका लक्षात घेता संबंधित विभागांनी प्रकाशव्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
जिल्ह्यातील महत्त्वाच्या या राज्य मार्गावर दिवसाबरोबरच रात्रीही वाहनांची वर्दळ वाढत आहे. हा मार्ग अलिबागसह रामराज, नागाव, रेवदंडा आणि पुढे मुरूड तालुक्याला जोडतो. धरमतर पुलापासून शहाबाज, पांडवादेवी, पोयनाड, पेझारी, पळी, तिनवीरा, मनुशेठ वाडा आणि कार्लेखिंड ही महत्त्वाची ठिकाणे या मार्गावर आहेत, मात्र अनेक ठिकाणी पथदिवे नसल्याने अंधारात प्रवास करावा लागतो.
रस्त्यालगत पथदिवे नसणे आणि रिफ्लेक्टरच्या अभावामुळे साईडपट्टी स्पष्टपणे न दिसणे, यामुळे दुचाकीस्वार व सायकलस्वारांना त्रास सहन करावा लागतो. स्थानिकांसह पर्यटकांची वाहने आणि अवजड वाहनांचीही या मार्गावर मोठी वर्दळ असते. पादचाऱ्यांनाही अंधारातून वाट काढावी लागते. लोकवस्ती नसलेल्या भागांत अंधाराचा फायदा घेऊन चोरी किंवा दरोड्याच्या घटना घडण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. विशेषतः रात्री ११ नंतर पोयनाड ते अलिबाग प्रवास दुचाकीस्वारांसाठी कठीण ठरत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था, महामार्ग विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने या समस्येकडे लक्ष देऊन पथदिवे बसवावेत किंवा आवश्यक ठिकाणी दिशादर्शक फलक लावावेत, अशी मागणी होत आहे.

धरण व मंदिर परिसरात प्रकाश हवा
तिनवीरा धरण हे अलिबाग तालुक्यातील महत्त्वाचे धरण असून, या परिसरात रात्री अंधार असतो. सुरक्षेच्या दृष्टीने येथे वीजपुरवठ्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे. तसेच कार्लेखिंडीत पात्रुदेवीचे मंदिर असून, या ठिकाणीही पथदिवे बसवावेत किंवा पुरेसा प्रकाश उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elon Musk: ''मी कोणत्याही गोऱ्या व्यक्तीला देशाच्या निर्णयात हस्तक्षेप करू देणार नाही''; इलॉन मस्क वादावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले?

Delhi Protest Controversy : "सीजेपीच्या आंदोलनामागे अमेरिकन अब्जाधीश इलॉन मस्कचा हात!"; भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांचा खळबळजनक आरोप

Delhi Protest High Drama : 'तिरंगा मार्च' सुरू होण्यापूर्वी अवघ्या १० मिनिटे आधी मोठी कारवाई! सीजेपी प्रमुख अभिजीत दिपकेंना दिल्ली पोलिसांकडून पुन्हा ताब्यात

Marathi News Live Updates: तिरंगा मोर्चापूर्वीच अभिजीत दिपके आणि नेहा बोरा पोलिसांच्या ताब्यात; कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी

Delhi News : जंतर-मंतर कुणाचे?

SCROLL FOR NEXT