मुंबई

नवी मुंबईत कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड

CD

कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड
नवी मुंबईत सरसकट ४५ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान मंजूर
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १६ : पालिकेतील सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आणि आशा स्वयंसेविकांना यंदा दिवाळीनिमित्त प्रत्येकी ४५ हजार रुपये इतके समान सानुग्रह अनुदान देण्याच्या प्रस्तावाला महासभेने सर्वानुमते मंजुरी दिली आहे. वनमंत्री गणेश नाईक यांनी केलेल्या घोषणेनुसार सभागृह नेते सागर नाईक यांनी मांडलेला हा ठराव महापालिकेत एकमुखाने मंजूर करण्यात आला. महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांच्या अनुमतीने महापालिकेतील सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी, शिक्षक तसेच आशा स्वयंसेविकांना दिवाळीनिमित्त प्रत्येकी ४५ हजार रुपये इतके समान सानुग्रह अनुदान (बोनस) देण्याचा ऐतिहासिक ठराव सर्वानुमते मंजूर केला आहे.
सभागृहाचे कामकाज सुरू होताच सागर नाईक यांनी सानुग्रह अनुदानाचा प्रस्ताव सभागृहापुढे मांडला. महापालिकेत काम करणारा प्रत्येक कर्मचारी दिवाळी सानुग्रह अनुदानाची वाट पाहत असतो. गेल्या वर्षीपेक्षा यंदा अधिक उत्तम दिवाळी साजरी व्हावी, या उद्देशाने गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हा ४५ हजारांचा प्रस्ताव आणल्याचे सागर नाईक यांनी सांगितले. युनियनने ४३ हजार रुपयांची मागणी केली होती; मात्र नाईक साहेबांनी ती रक्कम ४५ हजार रुपये करून कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चर्चेदरम्यान शिवसेनेचे नगरसेवक शिवराम पाटील यांनी या निर्णयाचे स्वागत करतानाच सर्व कर्मचाऱ्यांना ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची उपसूचना मांडली आणि ज्येष्ठ नगरसेवकांनी त्याला अनुमोदन दिले. गेल्या वर्षी साधारण ३४,५०० रुपये सानुग्रह अनुदान दिले गेले होते, तर आशा स्वयंसेविकांना १८,५०० रुपये मिळाले होते. यंदा आशा स्वयंसेविकांना थेट ४५ हजार रुपयांच्या टप्प्यात आणल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केले. तसेच कंत्राटी, ठोक मानधन, प्राथमिक व माध्यमिक शिक्षक, बालवाडी शिक्षिका, शालेय पोषण आहार व आरोग्य विभागातील कर्मचारी अशा सुमारे ३,२२९ कर्मचाऱ्यांसह इतर सर्वच घटकांना विनाअट लाभ मिळावा, अशी मागणी केली. महापौर सुजाता पाटील यांनी सर्व सदस्यांचे व गणेश नाईक यांचे आभार मानत शासकीय असो किंवा अशासकीय यामुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी निश्चितच गोड होणार आहे, असे सांगत प्रस्ताव सर्वानुमते मंजूर झाल्याची घोषणा केली.

नवी मुंबई पालिका राज्यात अव्वल
नगरसेवक रवींद्र इथापे यांनी प्रस्तावाला पाठिंबा देताना सांगितले, की २०१९ मध्ये २३,५०० रुपयांवरून सुरू झालेली ही वाढ गेल्या वर्षी ३४,५०० आणि आता थेट ४५ हजारांवर पोहोचली आहे. प्रतिनियुक्तीवरील अधिकारी, करार, कंत्राटी व तात्पुरत्या कर्मचाऱ्यांना सरसकट ही रक्कम देऊन पालिकेने राज्यात एक नवा आदर्श वस्तुपाठ ठेवला आहे. नवी मुंबई पालिका नेहमीच पुढाकार घेते आणि इतर पालिका तिच्या पावलावर पाऊल ठेवतात, असा दावा त्यांनी केला.

२३ कोटींचा अतिरिक्त भार
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी या निर्णयाच्या प्रशासकीय व आर्थिक बाबींवर प्रकाश टाकला. या निर्णयामुळे पालिकेतील सुमारे पाच हजार १२१ कर्मचाऱ्यांना लाभ होणार असून, पालिकेच्या तिजोरीवर २३ कोटींचा खर्च येईल. तसेच नव्याने समाविष्ट झालेल्या १४ गावांमधील कर्मचाऱ्यांच्या समायोजनाची कारवाई सुरू असून, त्यांचाही आकडा यात जोडला जाईल. यासाठी अंदाजपत्रकात पुनर्विनियोजन करावे लागेल, असे सांगत त्यांनी पालिकेचे उत्पन्न वाढवण्याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे नमूद केले.

ठाणे महापालिकेवरून सभागृहात रंगले चिमटे
सानुग्रह अनुदानावरील चर्चेदरम्यान लोकप्रतिनिधींमध्ये मजेशीर टोलेबाजी पाहायला मिळाली. नवी मुंबई पालिका जो निर्णय घेते, त्यावर इतर महापालिका नंतर री ओढतात, असा टोला सभागृह नेते सागर यांनी लगावला. सागर नाईक यांनी मिश्कील टिप्पणी केली, की पुढच्या वेळेस आपण ठाणे महापालिकेपेक्षा १,००० रुपये जास्त म्हणजे ५१ हजार रुपये बोनस घेऊन येऊ! तसेच ठाणे पालिकेच्या कर्मचाऱ्यांनाही ४५ हजार रुपये बोनस मिळावा म्हणून सर्व नगरसेवकांनी ठाणे महापालिकेला पत्र लिहून शिफारस करावी, असा टोला त्यांनी लगावताच सभागृहात हास्यकल्लोळ उडाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Tiranga March : अभिजीत दीपके पोलिसांच्या ताब्यात; ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनापूर्वी दिल्ली पोलिसांची कारवाई, दिल्लीत मोठा पोलीस बंदोबस्त

Caller ID: आता अनोळखी कॉल्सचा खेळ खल्लास; Jio, Airtel, Vi ग्राहकांसाठी मोठा निर्णय, १ नोव्हेंबरपासून...

Marathi News Live Updates: जामनेरमध्ये काळीज पिळवटून टाकणारा अपघात; ट्रक-दुचाकीच्या धडकेत ३ बालकांसह एकाच कुटुंबातील ६ ठार

Anand Dubey: आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयाने सोडली पक्षाची साथ, मशाल सोडून हाती घेतलं धनुष्यबाण

Kannad News : दुष्काळ, नापिकी आणि बेरोजगारीच्या चिंतेतून तरुणाने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT