Kiran Gaikwad
sakal
चापानेर - कन्नड तालुक्यातील जवळी येथील किरण सुभाष गायकवाड (वय-२८) या बेरोजगार तरुणाचा विषारी औषध प्राशन केल्याने मृत्यू झाल्याची घटना बुधवार (ता. १४) रोजी रात्री उघडकीस आली. अल्पभूधारक कुटुंब, शेतीतील नापिकी, यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे पिकांचे झालेले नुकसान आणि पेरणीसाठी घेतलेल्या कर्जाची चिंता यामुळे तो मानसिक तणावात असल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले.