तारप्याच्या सुरांनी मोखाडा दुमदुमले
पारंपरिक कलेचा वारसा जपण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन
मोखाडा, ता. १६ (बातमीदार) : रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, मोखाडा येथे वाचन प्रेरणा दिनानिमित्त पद्मश्री पुरस्कारप्राप्त तारपा वादक भिकल्या लाडक्या धिंडा यांचा सत्कार आणि विद्यार्थ्यांशी संवाद कार्यक्रम उत्साहात पार पडला. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना आदिवासी संस्कृती आणि पारंपरिक कलेची ओळख करून देण्यात आली.
विद्यालयाच्या प्रवेशद्वारापासून लेझीम, ढोल-ताशांचा गजर आणि विद्यार्थ्यांच्या टाळ्यांच्या कडकडाटात भिकल्या धिंडा यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष नरेंद्र पाटील होते, तर मनोज कामडी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी भिकल्या धिंडा यांचे पुत्र यशवंत धिंडा, प्रकाश निकम, प्रदीप वाघ, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अशोक सालकर, उपाध्यक्ष जयराम वाघ यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
विद्यालयाचे प्राचार्य महेश घुले यांच्या हस्ते भिकल्या धिंडा यांना रयत शिक्षण संस्थेची मानाची शाल आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना तारपा हे आदिवासी संस्कृतीचे अविभाज्य अंग असल्याचे त्यांनी सांगितले. या कलेप्रती असलेली श्रद्धा, निष्ठा आणि सातत्यपूर्ण साधना यांमुळेच आपल्याला हा सन्मान मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी तारपा वादन सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
आदिवासी संस्कृतीचे जतन व संवर्धन करून हा अमूल्य वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने आपण नातवाला सोबत घेऊन विविध ठिकाणी जात असल्याचेही त्यांनी सांगितले. पारंपरिक कलेचा वारसा नव्या पिढीकडे सोपविण्याची त्यांची तळमळ विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.