मुंबई

पालघर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा!

CD

पालघर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा!

कुणबी सेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

पालघर, ता. १६ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यातील सर्व आठही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करावेत, या मागणीसाठी कुणबी सेना आणि समविचारी सामाजिक संघटनांच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मागण्यांचा विचार न झाल्यास शेतकऱ्यांना तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी दिला.
राज्य शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत पालघर जिल्ह्यातील तलासरी, जव्हार आणि मोखाडा या तीन तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, जिल्ह्यातील सर्व आठही तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीचे नुकसान झाल्यानंतरही भरपाई मिळाली नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यातच पाणीटंचाई आणि दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढल्याचे कुणबी सेनेचे जिल्हाप्रमुख अविनाश पाटील यांनी सांगितले.
दुष्काळाचे गांभीर्य लक्षात घेऊन जाचक निकष आणि पंचनाम्यांशिवाय प्रतिएकर दीड लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, शेतीच्या दुरुस्तीसाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे सुरू करावीत, तसेच सर्व कोरडवाहू शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, अशा मागण्या करण्यात आल्या. कर्जमाफीसाठी लावण्यात आलेल्या निकषांमुळे अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याचेही आंदोलकांनी नमूद केले.
पालघर येथील छत्रपती शिवाजी चौकातून निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर त्याचे सभेत रूपांतर झाले. या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Protest Controversy : "सीजेपीच्या आंदोलनामागे अमेरिकन अब्जाधीश इलॉन मस्कचा हात!"; भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांचा खळबळजनक आरोप

१७ ऑक्टोबरला सूर्याचं राशीपरिवर्तन; मेष राशीसह ६ राशींचं नशीब पालटणार? मिळू शकतो मोठा फायदा

Marathi News Live Updates: 'लहरा दो तिरंगा' मोर्चाच्या १० मिनिटे आधी हायव्होल्टेज ड्रामा; अभिजीत दिपके यांना दिल्ली पोलिसांनी घेतले ताब्यात

ना श्रीराम ना माधुरी; 'ही' आहे धकधक गर्लच्या घराची नेमप्लेट, फराह खानसुद्धा झाली अवाक

CJP Tiranga March : अभिजीत दीपके पोलिसांच्या ताब्यात; ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनापूर्वी दिल्ली पोलिसांची कारवाई, दिल्लीत मोठा पोलीस बंदोबस्त

SCROLL FOR NEXT