मुंबई

मोबाईलचा वापर मर्यादित ठेवा!

CD

मोबाईलचा वापर मर्यादित ठेवा!
ठाण्यात ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ उपक्रमाचा सुरू
ठाणे, ता. १६ (बातमीदार) : मोबाईलचा अतिवापर, अभ्यासाचा ताण आणि बदलती जीवनशैली यांमुळे तरुणांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यापुढे नवी आव्हाने निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ उपक्रमाचा ठाण्यात प्रारंभ करण्यात आला. विद्या प्रसारक मंडळाच्या बी. एन. बांदोडकर महाविद्यालयात आयोजित या कार्यक्रमात ६०० हून अधिक विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. नियमित व्यायाम, ध्यानधारणा, सकस आहार, पुरेशी झोप आणि मोबाईलच्या वापरावर नियंत्रण ठेवण्याचे महत्त्व तज्ज्ञांनी अधोरेखित केले.
विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच समाजातही आरोग्यविषयक जनजागृती करावी. त्यांनी ‘आरोग्यदूत’ म्हणून पुढे येऊन निरोगी समाजनिर्मितीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन डॉ. राहुल कुलकर्णी यांनी केले. आरोग्यदायी सवयी, मानसिक स्वास्थ्य आणि सामाजिक जबाबदारी यांचे महत्त्व अधोरेखित करणारा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
महाराष्ट्र शासनाच्या महाकेअर संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अजय चंदनवाले यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. या वेळी मानसोपचारतज्ज्ञ डॉ. शैलेश उमाटे, मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे ठाणे समन्वयक डॉ. राहुल कुलकर्णी, ज्येष्ठ संपादक मिलिंद बल्लाळ, डॉ. राजलक्ष्मी वालावलकर, महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका डॉ. वृंदा मंजरामकर आदींची उपस्थित होती.

मानसिक आरोग्य जपण्याची गरज
मानसिक आरोग्याच्या समस्यांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज मानसोपचारतज्ज्ञ डॉ. शैलेश उमाटे यांनी व्यक्त केली. देशातील सुमारे सात कोटी नागरिक मानसिक आरोग्याच्या समस्यांना सामोरे जात असल्याची माहिती त्यांनी दिली. मोबाईलचा वाढता वापर आणि जाहिरातींमधून तंबाखू व मद्यसेवनाचे होणारे चित्रण तरुणांवर प्रभाव टाकू शकते, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहून आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारावी, असे आवाहन त्यांनी केले.

Delhi Protest Controversy : "सीजेपीच्या आंदोलनामागे अमेरिकन अब्जाधीश इलॉन मस्कचा हात!"; भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांचा खळबळजनक आरोप

Delhi Protest High Drama : 'तिरंगा मार्च' सुरू होण्यापूर्वी अवघ्या १० मिनिटे आधी मोठी कारवाई! सीजेपी प्रमुख अभिजीत दिपकेंना दिल्ली पोलिसांकडून पुन्हा ताब्यात

Marathi News Live Updates: तिरंगा मोर्चापूर्वीच अभिजीत दिपके आणि नेहा बोरा पोलिसांच्या ताब्यात; कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी

YUZVENDRA CHAHAL: लग्न तुटल्यानंतर चहलला पॅनिक अटॅक, दारूचं व्यसनही जडलं! २६ दिवस रिहॅबमध्ये काय घडलं?

ना श्रीराम ना माधुरी; 'ही' आहे धकधक गर्लच्या घराची नेमप्लेट, फराह खानसुद्धा झाली अवाक

SCROLL FOR NEXT