पोलिसांनी बोलावल्यास
चौकशीला जाणार ः मीनाक्षी शिंदे
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १६ : शिवसेनेचे (ठाकरे गट) विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात पोलिसांनी चौकशीसाठी बोलावल्यास सामोरे जाणार असल्याचे माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी स्पष्ट केले. पती राजेंद्र शिंदे यांची गेल्या दोन दिवसांपासून पोलिसांकडून चौकशी सुरू असून, या प्रकरणात पोलिसांना पूर्ण सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी आज सांगितले.
ठाणे महापालिकेची महासभा शुक्रवारी (ता. १६) पार पडली. पूर्णेकर यांच्या हत्येनंतरची पहिलीच महासभा असल्याने मीनाक्षी शिंदे उपस्थित राहणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते; परंतु मिनाक्षी शिंदे महासभेला उपस्थित राहिल्या आणि त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांनी या हत्येमागे मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांचा हात असल्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर राजेंद्र शिंदे यांचीही पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
प्रभागात काम करताना अनेक व्यक्तींशी संपर्क येत असतो, असे सांगत त्यांनी आरोपींशी ओळख असल्याच्या मुद्द्यावरही भूमिका मांडली. ज्या प्रभागातील आरोपी आहेत, त्याच प्रभागात आपला जन्म झाला असून, तेथील अनेक व्यक्ती आपल्या परिचयाच्या आहेत, मात्र केवळ ओळख असल्याने गुन्ह्याशी थेट संबंध जोडणे चुकीचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.