एकाच छताखाली ४४८ शासकीय सेवा
मुरबाड, ता. १६ (बातमीदार) : शासकीय सेवा नागरिकांपर्यंत सहज पोहोचविण्यासह पात्र लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मुरबाड तहसील कार्यालयाच्या वतीने सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुकास्तरीय शिबिर घेण्यात आले. तहसीलदार अभिजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कुणबी भवन येथे झालेल्या या शिबिरात विविध शासकीय सेवांअंतर्गत एकूण ४४८ सेवा वितरणाची नोंद झाली.
ठाणे जिल्हाधिकारी आणि कल्याण उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित शिबिरात विविध शासकीय दाखले, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना, पीएम किसान योजना, महिला शेतकरी योजना आणि रेशनकार्डविषयक सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. तसेच आयुष्मान भारत कार्ड व आभा कार्ड नोंदणी, आरोग्य तपासणी आणि आरोग्यविषयक मार्गदर्शनही करण्यात आले. एकाच ठिकाणी विविध सेवा उपलब्ध झाल्याने नागरिकांची शासकीय कामांसाठी होणारी धावपळ कमी करण्यास मदत झाली.
शेतकऱ्यांना ई-पीक पाहणीचे आवाहन
शिबिरादरम्यान नायब तहसीलदार अमोल शिंदे यांनी मुरबाड तालुक्यातील शेतकऱ्यांना विहित मुदतीत ई-पीक पाहणी पूर्ण करण्याचे आवाहन केले. शेतातील पिकांची अचूक नोंदणी करणे आवश्यक असून, शेतकऱ्यांनी पिकांची माहिती वेळेत नोंदवावी, असे त्यांनी सांगितले.
या शिबिराला जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाषदादा पवार, तहसीलदार अभिजित देशमुख, नगराध्यक्ष मोहन गडगे, माजी नगराध्यक्ष मोहन सासे, नायब तहसीलदार अमोल शिंदे यांच्यासह राठोड, उल्हास बांगर, रामभाऊ दळवी, दीपक पवार, जितेंद्र भावार्थी, प्रकाश पवार, सुरेश बांगर, मोहन भावार्थी, संतोष पवार, एकनाथ पोंगरे, लक्ष्मण घागस आदी मान्यवर, महसूल कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.
शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे, नागरिकांच्या कामांचा निपटारा सुलभ करणे आणि प्रशासन व नागरिकांमधील समन्वय वाढविणे हा या शिबिराचा प्रमुख उद्देश होता. ४४८ सेवांच्या वितरणामुळे अभियानातून नागरिकांना विविध शासकीय सुविधांचा लाभ मिळाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.