मुंबई

‘गोल्ड ईटीएफ’मधील नव्या गुंतवणुकीला स्थगिती

CD

‘गोल्ड ईटीएफ’मधील नव्या गुंतवणुकीला स्थगिती
म्युच्युअल फंड कंपन्यांकडून नोटीस जारी
नवी दिल्ली, ता. १६ : देशातील सणासुदीच्या काळाच्या पार्श्वभूमीवर, अनेक मोठ्या म्युच्युअल फंड कंपन्यांनी गुरुवारी (ता. १५) रात्री उशिरा नोटीस जारी करून गोल्ड एक्स्चेंज-ट्रेडेड फंडांमधील मोठ्या गुंतवणुकीवर स्थगिती आणली आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात ‘गोल्ड ईटीएफ’मध्ये नवी गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांना ती करता येणार नाही. सणासुदीत होणाऱ्या सोन्याच्या वाढत्या मागणीवर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी म्हटले आहे.

एचडीएफसी म्युच्युअल फंड, कोटक महिंद्रा म्युच्युअल फंड आणि युटीआय म्युच्युअल फंड यांसारख्या कंपन्यांनी याबाबत सार्वजनिक नोटिसा जारी केल्या आहेत, परंतु त्यात या स्थगितीचे नेमके कारण दिलेले नाही. गुंतवणूकदार त्यांच्याकडे असलेल्या ‘गोल्ड ईटीएफ’ची विक्री सुरू ठेवू शकतील. ज्यांची आधीपासून सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) सुरू आहे, त्यांची गुंतवणूकही सध्याच्या ‘नेट ॲसेट व्हॅल्यू’नुसार सुरू राहील, असे म्युच्युअल फंड कंपन्यांनी स्पष्ट केले आहे.

एका म्युच्युअल फंड अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, म्युच्युअल फंड कंपन्यांनी अधिकृतपणे याचे कारण सांगितले नसले, तरी हा निर्णय भांडवल बाजार नियामक ‘सेबी’सोबत झालेल्या चर्चेनंतर घेण्यात आला आहे. ‘सेबी’कडून तशी सूचना मिळाल्याचे सुवर्ण उद्योगातील अधिकाऱ्यांनीही नमूद केले आहे. याशिवाय, जागतिक स्तरावर तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे भारताचे आयात बिल वाढले आहे, तसेच परदेशी गुंतवणूकदारांकडून भारतीय शेअर बाजारात झालेली मोठी विक्री, या कारणांमुळे यंदा भारतीय रुपयावर दबाव निर्माण झाला आहे. सोन्याची मोठी मागणीही रुपयावर दबाव टाकत आहे. परिणामी सरकारने या वर्षाच्या सुरुवातीला सोने आणि चांदीवरील आयात शुल्कात वाढ केली होती. आता ऑक्टोबरमध्ये दसरा आणि नोव्हेंबरच्या सुरुवातीला दिवाळीचा सण असल्याने या काळात सोन्याची मागणी वाढण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी शेअर बाजारातील कमी परताव्यामुळे सणासुदीच्या काळात सोने आणि चांदीच्या ‘ईटीएफ’मधील गुंतवणुकीत मोठी वाढ झाली होती. त्यामुळे हे प्रतिबंधात्मक पाऊल उचललेले असू शकते, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी म्हटले आहे. भारत हा जगातील चांदीचा सर्वांत मोठा आणि सोन्याचा दुसरा सर्वांत मोठा ग्राहक देश आहे, मात्र आपली बहुतांश मागणी पूर्ण करण्यासाठी देशाला आयातीवर अवलंबून राहावे लागते, ज्यामुळे व्यापार तुटीवर दबाव येऊ शकतो, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

हे पाऊल आश्चर्यकारक आहे, कारण गेल्या दोन महिन्यांत वर्षभरापूर्वीच्या तुलनेत सोने आणि चांदीची आयात मोठ्या प्रमाणात घटली आहे आणि त्यामुळे व्यापार तुटीत कोणताही हातभार लागलेला नाही. सप्टेंबर महिन्यात सोन्याची आयात २.३ अब्ज डॉलरवरून १.८ अब्ज डॉलरपर्यंत खाली आली आहे. ऑक्टोबरमध्ये आयातीत होणारी वाढ टाळण्यासाठी हे एक खबरदारीचे पाऊल असावे असे वाटते, असे ‘ईटीएफ’ला सोने पुरवणाऱ्या एका खासगी बँकेच्या अधिकाऱ्याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लालकृष्ण अडवाणींची प्रकृती बिघडली, अपोलो रुग्णालयात केलं दाखल; उपचार सुरू

CJP Protest: भारतातील आंदोलनांना खरंच अमेरिकेतून फंडिंग? प्रसिद्ध गायिकेने थेट उद्योगपतीचं नाव घेत केला आरोप

Pune Crime : विसर्जन मिरवणुकीत भाविकांना लुटणाऱ्या टोळीकडून २१ लाखांचे दागिने जप्त; उत्तर प्रदेशातील टोळीवर फरासखाना पोलिसांची कारवाई

Dive Ghat Close : पालखी महामार्गाच्या कामासाठी दिवेघाट दोन तास बंद

IND W VS ZIM W: संकटमोचक बनून आली दीप्ती शर्मा! झिम्बाब्वेविरुद्ध २७ धावांत ४ विकेट्स गमावल्यानंतरही भारताचा थरारक विजय

SCROLL FOR NEXT