मुंबई

विद्यार्थ्यांनी घेतले सायबर सुरक्षिततेचे धडे

CD

विद्यार्थ्यांनी घेतले सायबर सुरक्षिततेचे धडे

सुरक्षित इंटरनेट वापराबाबत जनजागृती

प्रभादेवी ता.१६ : मुलांमध्ये सायबर सुरक्षिततेविषयी जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने कॅस्परस्कीच्या वतीने घाटकोपर येथील किडझेनियामधील सायबर सुरक्षा केंद्रात मंगळवारी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात विद्यार्थी आणि पालकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
‘रोल प्ले’ उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना इंटरनेटचा सुरक्षित वापर, ऑनलाइन वर्तन आणि सायबर धोक्यांपासून बचाव करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्यक्ष सरावाच्या माध्यमातून सायबर सुरक्षेचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
आजच्या डिजिटल युगात मुले यूट्यूब, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप आणि फेसबुक यांसारख्या माध्यमांचा वापर करतात. गृहपाठ आणि दैनंदिन संवादासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सेवांचाही वापर वाढत आहे. मात्र, या माध्यमांतून चुकीची माहिती किंवा अयोग्य मजकूर समोर येण्याची शक्यता असल्याने पालकांनी मुलांच्या ऑनलाइन वर्तनाकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.मुलांशी ऑनलाइन अनुभवांबाबत मोकळा संवाद साधावा, स्मार्टफोनवर कंटेंट फिल्टर आणि पालक नियंत्रणाची सुविधा वापरावी, तसेच अनोळखी लिंक, बक्षिसांची आमिषे आणि संशयास्पद संदेशांपासून सावध राहण्याबाबत मुलांना मार्गदर्शन करावे, असे आवाहन करण्यात आले.
“कुटुंबांनी एकत्रितपणे सायबर सुरक्षेबाबत माहिती घेतल्यास मुलांमध्ये सुरक्षित डिजिटल सवयी विकसित होऊ शकतात. भारतभर डिजिटलदृष्ट्या जागरूक पिढी घडविणे हा आमच्या मोहिमेचा उद्देश आहे,” असे कॅस्परस्कीचे पुरुषोत्तम भाटिया यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W VS ZIM W: संकटमोचक बनून आली दीप्ती शर्मा! झिम्बाब्वेविरुद्ध २७ धावांत ४ विकेट्स गमावल्यानंतरही भारताचा थरारक विजय

Bombay High Court Decision : महाराष्ट्रात दिवाळीत फटाके फोडण्यावर निर्बंध; मुंबई उच्च न्यायालयाचा अत्यंत मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय!

Delhi Protest High Voltage : "ज्ञानेश कुमारांना भारतरत्न द्या!"; सीजेपीच्या 'तिरंगा यात्रे'दरम्यान अभिजीत दिपकेंविरोधात घोषणाबाजी, 'मोदी-मोदी'च्या नाऱ्यांनी दणाणला परिसर

Albatya Galbatya 2.0 Drama : ‘अलबत्या गलबत्या’ने रचला इतिहास; सलग सात प्रयोगांचा ‘शिखर विश्वविक्रम’

Badnapur Drought : ‘पाच हजारांत दिवाळी कशी साजरी करायची? दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा आर्त सवाल; रामदास आठवले यांच्यासमोर शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा

SCROLL FOR NEXT