मुंबई

सेवा संकल्प अभियान आता निरंतर राबवा!

CD

सेवा संकल्प अभियान निरंतर राबवा!
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १६ : शासकीय योजनांचे लाभ पात्र नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सुरू केलेले सेवा संकल्प अभियान निरंतर राबवावे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्याच्या समस्या जाणून घेत त्याला शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी (ता. १६) ठाण्यात दिले. या अभियानांतर्गत २६ प्रकारचे लाभ दिले जाणार असून, सुमारे दीड लाख नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट आहे.

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने गडकरी रंगायतन येथे आयोजित सेवा संकल्प अभियानाच्या कार्यक्रमात शिंदे बोलत होते. अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि विविध शासकीय विभागांनी गेल्या महिनाभरात केलेल्या कामाचे त्यांनी कौतुक केले. कार्यक्रमाला खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. ‘शासन आपल्या दारी’ अभियानातून साडेचार कोटी लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला. सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देणे ही सरकारची जबाबदारी आहे. सेवा संकल्प अभियान हा केवळ शासकीय कार्यक्रम नसून, नागरिकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न आहे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. पद आणि प्रतिष्ठेपेक्षा लोकांसाठी केलेले काम महत्त्वाचे असते. त्यामुळे कोणत्याही पदावर असले तरी सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W VS ZIM W: संकटमोचक बनून आली दीप्ती शर्मा! झिम्बाब्वेविरुद्ध २७ धावांत ४ विकेट्स गमावल्यानंतरही भारताचा थरारक विजय

Bombay High Court Decision : महाराष्ट्रात दिवाळीत फटाके फोडण्यावर निर्बंध; मुंबई उच्च न्यायालयाचा अत्यंत मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय!

Delhi Protest High Voltage : "ज्ञानेश कुमारांना भारतरत्न द्या!"; सीजेपीच्या 'तिरंगा यात्रे'दरम्यान अभिजीत दिपकेंविरोधात घोषणाबाजी, 'मोदी-मोदी'च्या नाऱ्यांनी दणाणला परिसर

Albatya Galbatya 2.0 Drama : ‘अलबत्या गलबत्या’ने रचला इतिहास; सलग सात प्रयोगांचा ‘शिखर विश्वविक्रम’

Badnapur Drought : ‘पाच हजारांत दिवाळी कशी साजरी करायची? दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा आर्त सवाल; रामदास आठवले यांच्यासमोर शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा

SCROLL FOR NEXT