मुंबई

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर ॲग्रीकल्चर थॉट्स अँड पॉलिसीज’ पुस्तकाचे प्रकाशन;

CD

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर ॲग्रीकल्चर
थॉट्स अँड पॉलिसीज’ पुस्तकाचे प्रकाशन
नव्या पिढीपर्यंत विचार पोहोचविण्याचा मुंबई विद्यापीठाचा संकल्प
मुंबई, ता. १७ : महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त मुंबई विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्राच्या वतीने शनिवारी महाड येथील बी. एस. बुटाला सांस्कृतिक सभागृहात विशेष कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात मुंबई विद्यापीठाने तयार केलेले ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर ॲग्रीकल्चर थॉट्स अँड पॉलिसीज’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
सामाजिक समता, मानवी प्रतिष्ठा आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांचा प्रसार करण्यासोबतच बाबासाहेबांच्या कृषीविषयक विचारांचा अभ्यास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यावर या कार्यक्रमात भर देण्यात आला. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य ॲड. क्षितिज गायकवाड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्राचे संचालक प्रा. वाल्मिक सरवदे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी चवदार तळे सत्याग्रह हा केवळ पाण्याच्या अधिकाराचा लढा नसून, मानवी प्रतिष्ठा, समता आणि सामाजिक न्यायाचा ऐतिहासिक उद्‍घोष असल्याचे सांगितले. महाड सत्याग्रहातून सार्वजनिक पाणवठ्यावर समान हक्काचा प्रश्न ठामपणे मांडण्यात आला. या संघर्षाला अहिंसा, संघटन आणि वैचारिक स्पष्टतेची जोड होती, असे त्यांनी नमूद केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समताधिष्ठित समाजनिर्मितीसाठी व्यापक चळवळ उभी केली. ते सामाजिक क्रांतीचे उद्‍गाते असण्यासोबतच प्रख्यात अर्थतज्ज्ञ, कायदेतज्ज्ञ, भारतीय घटनेचे शिल्पकार आणि कृषीविषयक प्रश्नांचे सखोल अभ्यासक होते. त्यांच्या विचारांचा संशोधनाच्या माध्यमातून अभ्यास करून तो नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. मुंबई विद्यापीठाच्या वतीने या ऐतिहासिक शताब्दी वर्षानिमित्त वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रमुख पाहुणे ॲड. क्षितिज गायकवाड यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समताधिष्ठित समाजनिर्मितीच्या कार्याचा आढावा घेतला. बाबासाहेबांना अपेक्षित असलेली समताधिष्ठित समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रा. वाल्मिक सरवदे यांनी प्रकाशित पुस्तकाचा परिचय करून दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तोच अपरकट, तेच पुढे येऊन षटकार खेचणे... वीरेंद्र सेहगावच्या लेकाची 'सेम टू सेम' बॅटिंग; आर्यवीरच्या १७३ धावांचा Video Viral

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना दिलासा; सशर्त जामीन मंजूर करताना न्यायालयाने काय घातली अट?

Latest Marathi News Live Update : बुलडाण्यात सर्क्युलर रोडवर धावत्या बसला आग! युवकांच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला

Australia Hate Campaign : "ही तुमची संस्कृती आहे का?"; ऑस्ट्रेलियात भारतीय उत्पादनांवर वर्णद्वेषी स्टिकर्स, भारतीयांविरोधात द्वेष का वाढतोय?

Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घराजवळ 'ही' झाडे लावणे मानले जाते शुभ; जाणून घ्या घरासाठी फायदेशीर असणारी रोपे!

SCROLL FOR NEXT