दुर्बल घटकांच्या घरांवर सौर प्रकल्प
एक किलोवाॅटची क्षमता; २५ वर्षे मोफत विजेचा लाभ
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्यांच्या घरात आता सौरऊर्जेचा प्रकाश पडणार आहे. त्यासाठी महावितरणने स्मार्ट योजनेअंतर्गत मार्चअखेर दारिद्र्यरेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या पाच लाख घरांवर एक किलोवॉटचा सौर प्रकल्प बसवण्याचे उद्दिष्ट असल्याचे महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा यांनी स्पष्ट केले. या योजनेत केंद्राकडून ३० हजार तर राज्याकडून १७,५०० रुपयांपर्यंत अनुदान मिळणार असून, लाभार्थी २५ वर्षे मोफत विजेचा लाभ घेऊ शकणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या कार्यकाळानिमित्त महावितरणकडून प्रत्येक तालुक्यात विशेष सेवा कक्ष उभारून महिनाभर ‘सेवा संकल्प अभियान’ राबवले. एकाच ठिकाणी सर्व ग्राहकसेवा आणि विविध योजनांचा लाभ मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी लोकेश चंद्र यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कल्याण, चंद्रपूर, नाशिक, कोल्हापूर, भांडुप व पुणे येथील विशेष सेवा कक्षांशी थेट संवाद साधला. या वेळी लोकेश चंद्र यांनी आर्थिक दुर्बल घटकांच्या घराच्या छतावर पाच लाख सौर प्रकल्प उभारणार असल्याचे स्पष्ट केले. राज्यातील वीज ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी महावितरणने सुरू केलेले सेवा संकल्प अभियान हे केवळ महिनाभरापुरते मर्यादित न ठेवता त्यातील गतिमानता आणि ग्राहकाभिमुख सेवेची संस्कृती प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्याने कायमस्वरूपी अंगीकारावी, असे आवाहन चंद्र यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.