मुदतबाह्य खाद्यपदार्थांची पुनर्विक्री
भिवंडीत एफडीएची कारवाई; ३३.७१ लाखांचा माल जप्त, ११ जणांविरुद्ध गुन्हा
भिवंडी, ता. १७ (वार्ताहर) : मुदतबाह्य, खराब आणि उंदरांनी दूषित केलेले खाद्यपदार्थ नष्ट न करता त्यांची पुनर्विक्री करण्यासाठी साठवणूक केल्याचा प्रकार अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) कारवाईत उघड झाला. याप्रकरणी ३३ लाख ७१ हजार ५०० रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला. संबंधित कंपन्यांचे अधिकारी, गोदाम व्यवस्थापक आणि पुरवठादारांसह ११ जणांविरुद्ध शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स, रिलायन्स रिटेल, ब्लिंकिट, झोमॅटो हायपरप्युअर आणि संबंधित विल्हेवाट कंत्राटदारांशी निगडित व्यक्तींवर कारवाई करण्यात आली. भिवंडीतील गुलजार ट्रेडर्स आणि डिस्काउंट स्टोअरच्या माध्यमातून दूषित व मुदतबाह्य खाद्यपदार्थ खाण्यायोग्य असल्याचे भासवून त्यांची विक्री केल्याचा आरोप आहे. अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त प्रवीण बाळासाहेब शिंदे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक विजय मोरे तपास करीत आहेत.
......
तळोज्यात बनावट पनीरप्रकरणी गुन्हा
पनवेल (वार्ताहर) : परवाने निलंबित असतानाही तळोजा एमआयडीसीत दूध साठवणूक आणि पनीरनिर्मिती सुरू असल्याचा प्रकार उघड झाला. अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी (ता. १६) रात्री तीन आस्थापनांवर छापे टाकले. या कारवाईत दूध आणि पनीर नष्ट करण्यात आले, तर नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध तळोजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अस्वच्छ वातावरणात उत्पादन आणि आवश्यक परवान्यांचा अभाव यामुळे संबंधित आस्थापनांवर यापूर्वीही कारवाई करण्यात आली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.