मुंबई

मनोरीतील निःक्षारीकरण प्रकल्पाविरोधात १९ ऑक्टोबरला मच्छिमारांचा आक्रोश मोर्चा..

CD

मनोरीतील निःक्षारीकरण प्रकल्पाविरोधात आज जनआक्रोश मोर्चा
४०० एमएलडी प्रकल्पाला मच्छीमारांचा विरोध; रोजगार आणि सागरी जैवविविधतेला धोका असल्याची भीती
मालाड, ता. १८ (बातमीदार) : मनोरी येथे प्रस्तावित ४०० एमएलडी क्षमतेच्या समुद्राच्या खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर करणाऱ्या निःक्षारीकरण प्रकल्पाविरोधात मच्छीमार, शेतकरी आणि स्थानिक भूमिपुत्र आक्रमक झाले आहेत. या प्रकल्पाच्या विरोधात सोमवारी (ता. १९) सकाळी १० वाजता वांद्रे येथील मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
नॅशनल फिशवर्कर्स फोरमचे अध्यक्ष रामकृष्ण तांडेल, महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष लिओ कोलासो आणि अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार आहे. मनोरी, गोराई, मालवणी, भाटी, मढ आणि उत्तन परिसरातील मच्छीमार, शेतकरी व भूमिपुत्रांनी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नॅशनल फिशवर्कर्स फोरम, महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती, अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती, मढ ते गोराई मच्छीमार संघर्ष समिती, मनोरीतील विविध मच्छीमार सहकारी संस्था, गोराई व्हिलेजर्स वेल्फेअर असोसिएशन आणि गोराई शेतकरी विकास संस्थेसह विविध संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk Union Election 2026 : गोकुळच्या मतदान केंद्रावर सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेरा; मतपत्रीकेचे फोटो व्हायरल, नजर चुकवून मोबाईलवर काढले फोटो

Latest Marathi News Live Update : नारायण आबा पाटील, उत्तमराव जानकर आणि बाबासाहेब देशमुख महायुतीच्या पाठिशी? जयकुमार गोरेंचा दावा

आम्ही घाबरणार नाही, माघारही घेणार नाही! अभिजित दिपकेंनी सांगितला पुढचा प्लॅन, नेमकं काय म्हणाले?

Satara Farmer Loan Waiver: साताऱ्यात ७,७८९ शेतकरी कर्जमाफीपासून वंचित; कर्जमाफी होऊनही पात्रतेचा खोडा, धक्कादायक कराण आल समाेर!

सासऱ्यांनी सांगितलं एका वर्षाचा आत वजन घटव... कविता मेढेकर यांचा खुलासा, म्हणाल्या, 'माझे सासू-सासरे...'

SCROLL FOR NEXT