मुंबई

वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय, पाच वर्षांनंतर कार्यालयाच्या नावात अधिकृत बदल

CD

दोन संचालनालयांचे एकच ‘आयुक्तालय’!
वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय; पाच वर्षांनंतर कार्यालयाच्या नावात बदल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय आणि आयुष संचालनालय यांच्या प्रशासकीय कामकाजाचे नियंत्रण आयुक्तांकडे सोपविण्यात आले होते. आता पाच वर्षांनंतर दोन्ही कार्यालयांच्या नावातही अधिकृत बदल करण्यात आला आहे. यापुढे या कार्यालयाचे नाव ‘आयुक्तालय, वैद्यकीय शिक्षण, संशोधन व आयुष, मुंबई’ असे राहणार आहे, मात्र केवळ नाव बदलले असले तरी दोन्ही संचालनालयांची पदरचना, संवर्ग, सेवाप्रवेश नियम आणि ज्येष्ठता सूची जैसे थे राहणार आहे.
६ ऑक्टोबर २०२१ मध्ये वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे सक्षमीकरण करताना आयुक्तपद निर्माण करण्यात आले होते. त्यानंतर, वैद्यकीय शिक्षण व संशोधन तसेच आयुष या दोन्ही विभागांचे प्रशासकीय आणि वित्तीय नियंत्रण आयुक्तांकडे आले, मात्र कार्यालयीन नोंदी आणि अधिकृत पत्रव्यवहारात जुन्या नावांचाच वापर सुरू होता. आता शासन निर्णयाद्वारे त्याला अधिकृत स्वरूप देण्यात आले आहे.
नव्या नावामुळे राज्यातील शासकीय वैद्यकीय, दंत, नर्सिंग तसेच आयुष महाविद्यालये आणि त्यांच्याशी संलग्न रुग्णालयांच्या प्रशासकीय नियंत्रणात कोणताही बदल होणार नाही. शासनाच्या सर्व पत्रव्यवहारासह आदेश, नामफलक, शिक्के, संकेतस्थळ आणि ई-मेलमध्ये नव्या नावाचा वापर करावा लागणार आहे.

संचालकपद स्वतंत्र राहणार
दरम्यान, आयुक्तालयाच्या निर्मितीनंतरही संचालकपदाची शैक्षणिक आणि तांत्रिक भूमिका स्वतंत्र ठेवण्याची गरज व्यक्त केली जात आहे. राज्यातील वैद्यकीय शिक्षणाची शैक्षणिक बाजू आणि प्रशासकीय नियंत्रण यांची कार्यक्षेत्रे वेगळी असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Leopard Attack: नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; सर्वांसमोर नेले उचलून, चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावरुन महाकालीच्या दर्शनासाठी निघाले अन्..

वयाच्या ८८ व्या वर्षीही मर्दानी खेळांचा थरार! शांताबाई पवार यांची प्रेरणादायी कहाणी |Shantabai Pawar

रस्त्याचं काम सुरु असतानाच भरधाव कारची धडक, ८ मजुरांचा जागीच मृत्यू; अनेक जण गंभीर

Gokul Election Voting Percentage : गोकुळसाठी ९९.९६ % मतदान; सतेज पाटील, हसन मुश्रीफांची प्रतिष्ठा पणाला, उद्या मतमोजणी, कोण मारणार बाजी?, तालुका निहाय आकडेवारी

Gokul Milk Union Election 2026 : गोकुळच्या मतदान केंद्रावर सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेरा; मतपत्रीकेचे फोटो व्हायरल, नजर चुकवून मोबाईलवर काढले फोटो

SCROLL FOR NEXT