मुंबई

डहाणू तालुक्यात भातशेतीचे नुकसान

CD

पावसाअभावी दाणे भरण्यात अडथळा
कासा , ता. १८ (बातमीदार) : परतीच्या पावसाने दडी मारल्याने डहाणू तालुक्यातील अनेक भागांतही भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे यंदा अपेक्षित उत्पादन मिळण्याची शक्यता कमी झाली असून, लागवडीसाठी केलेला खर्चही वसूल होण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे. या पार्श्वभूमीवर डहाणू तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, तसेच तातडीने पीकनुकसानीचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडूनही होत आहे.
पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण आणि आदिवासी भागात भातशेती हा शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रमुख आधार आहे. वर्षभराच्या कुटुंबाच्या अन्नधान्याची गरज भागविण्यासोबतच अतिरिक्त भाताच्या विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर सण-उत्सव, घरखर्च आणि इतर गरजा भागवल्या जातात, मात्र यंदा पावसाच्या अनियमिततेमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्य शासनाने यापूर्वी जव्हार, मोखाडा आणि तलासरी या तीन तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश केला आहे, मात्र डहाणूसह विक्रमगड आणि वाडा तालुक्यांतील अनेक भागांतही पावसाअभावी भातपिकाचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीचे मूल्यमापन करताना केवळ तालुकानिहाय पर्जन्यमानाचा विचार न करता प्रत्यक्ष पीकनुकसानीची पाहणी करावी, अशी मागणी होत आहे.
कृषी विभागाने तातडीने शेतांमध्ये जाऊन नुकसानीचे वस्तुनिष्ठ सर्वेक्षण करावे, पंचनामे पूर्ण करावेत आणि बाधित शेतकऱ्यांना शासनाच्या निकषांनुसार आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही करण्यात येत आहे. यंदाच्या हंगामातील नुकसानीमुळे पुढील वर्षी भातशेतीसाठी लागणारा खर्च कसा उभा करायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.

‘शेती करावी की नाही, असा प्रश्न’
“आम्ही दरवर्षी भातशेती करतो. यंदा ९० दिवसांत तयार होणाऱ्या भाताची लागवड केली होती, मात्र पिकाच्या शेवटच्या टप्प्यात पावसाने दडी मारल्याने संपूर्ण भातशेतीचे नुकसान झाले आहे. लागवडीसाठी केलेला खर्चही भरून निघेल की नाही, याची चिंता आहे. त्यामुळे पुढील वर्षी भातशेती करावी की नाही, असा प्रश्न पडला आहे. शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी आणि डहाणू तालुकाही दुष्काळग्रस्त घोषित करावा,” अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अशोक भोईर यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Farmer Loan Waiver: साताऱ्यात ७,७८९ शेतकरी कर्जमाफीपासून वंचित; कर्जमाफी होऊनही पात्रतेचा खोडा, धक्कादायक कराण आल समाेर!

Nagpur Crime: डिजिटल अरेस्टचा आठ दिवसांचा सापळा! नागपुरातील ७५ वर्षीय निवृत्त कर्मचाऱ्याला २९ लाखांचा गंडा

माझ्यासाठी थांबू नकोस, मी आता... सचिन यांनी सांगितली लक्ष्मीकांत यांची 'नवरा माझा नवसाचा' दरम्यानची आठवण

समोर गोड बोलतात, पण मनात काही वेगळंच? चाणक्य नीती सांगते व्यक्ती ओळखण्याचे संकेत

Latest Marathi News Live Update : आमदार नारायण पाटील भाजपच्या मेळाव्यात; महायुतीच्या व्यासपीठावरील उपस्थितीने राजकीय चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT