मुंबई

आधी पाणी द्या, मगच नळजोडण्या तोडा!

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ : महापालिकेच्या जलवाहिन्यांतून पाणी मिळत नाही, तरी पाणीपट्टी भरावी लागते. दैनंदिन गरजांसाठी टँकरचे पाणी विकत घ्यावे लागते आणि त्यातच अनधिकृत नळजोडण्यांवरील कारवाईची भीतीही नागरिकांना सतावत आहे. दिवा शहरातील साबे परिसरातील नागरिकांची ही कोंडी ठाणे महापालिका प्रशासनाने कधी सोडवणार, असा थेट सवाल प्रभाग क्रमांक २९ च्या नगरसेविका अर्चना पाटील यांनी महासभेत उपस्थित केला. ‘आधी अधिकृत पाणीपुरवठा सुरू करा, मगच नळजोडण्या तोडण्याची कारवाई करा,’ अशी आक्रमक भूमिका घेत त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले.

दिवा साबे परिसरात महापालिकेच्या वाहिन्यांमधून पाणी पोहोचत नसताना नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारण्यापूर्वी प्रशासनाने यंत्रणेची जबाबदारी पार पाडावी, असे पाटील यांनी स्पष्ट केले. नागरिकांना पाणी देण्याची व्यवस्था नाही, मग त्यांच्याकडून अपेक्षा काय, असा सवाल उपस्थित करत त्यांनी अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष परिस्थितीची जाणीव करून दिली. साबे परिसरात कुठे पाणीपुरवठा होतो आणि कुठे होत नाही, याची अधिकाऱ्यांनी कधी प्रत्यक्ष पाहणी केली आहे का? ज्या ठिकाणी पाणीमीटर बसवले आहेत, त्यांची सद्यःस्थिती काय आहे? जलवाहिन्या असूनही नागरिकांच्या घरांपर्यंत पाणी पोहोचत नसेल, तर त्याची जबाबदारी कोणाची? असा सवाल पाटील यांनी उपस्थित केले. कार्यालयात बसून कागदोपत्री आढावा घेण्यापेक्षा प्रत्यक्ष जमिनीवरील परिस्थिती तपासा आणि त्यानंतरच कारवाईचे धोरण ठरवा, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, प्रथम अंतर्गत वाहिन्यांचे जाळे व्यवस्थित उभारून अधिकृत पाणीपुरवठा सुरू करावा. नागरिकांना नियमित आणि पुरेसे पाणी उपलब्ध करून द्यावे. त्यानंतरच अनधिकृत नळजोडण्यांवर कारवाई करावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली. महापालिकेने सुरळीत पाणीपुरवठा केल्यास नागरिकांना टँकरवर अवलंबून राहण्याची वेळच येणार नाही, असेही त्यांनी सुनावले.

टँकरचे पैसेही मोजा!
महापालिकेच्या जलवाहिन्यांमधून पाणी मिळत नसतानाही साबेतील नागरिकांना पाणीपट्टी भरावी लागत आहे. दुसरीकडे, पिण्यासह दैनंदिन वापरासाठी टँकर किंवा अन्य माध्यमांतून पाणी विकत घ्यावे लागत असल्याने नागरिकांच्या खिशाला दुहेरी कात्री लागत आहे. मूलभूत सुविधा पुरविण्यात अपयश येत असताना नागरिकांवर आर्थिक भार टाकणे कितपत योग्य, असा सवाल करत पाटील यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: टायगर श्रॉफवर गोळीबार; दुचाकीवरून आले तीन हल्लेखोर,धक्कादायक व्हिडिओ समोर

‘मतचोरी’चा आरोप करूनही माझ्यावर मानहानीचा खटला नाही, कारण...; राहुल गांधींचा मोठा दावा!

Latest Marathi News Live Update : टायगर श्रॉफ यांच्यावरील गोळीबारानंतर वर्षा गायकवाड यांची राज्य सरकावर टीका

Yavatmal News: सोयाबीनने ओलांडला साडेसहा हजारांचा टप्पा; अत्यल्प पावसामुळे घटले उत्पादन, बाजारात आवक कमी

Leopard Attack: नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; सर्वांसमोर नेले उचलून, चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावरुन महाकालीच्या दर्शनासाठी निघाले अन्..

SCROLL FOR NEXT