मुंबई

स्टेप लाइन : २५२ टन साठ्याच्या विल्हेवाटीवरून कारवाई; कार्यक्षेत्राबाहेरील छाप्यांचीही चौकशी

CD

मालेगावच्या सुपारी प्रकरणात पाच अधिकारी निलंबित
साठा विल्हेवाटीवरून कारवाई; कार्यक्षेत्राबाहेरील छाप्यांचीही चौकशी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : मालेगावातील सुमारे १० कोटी रुपये किमतीच्या सुपारीच्या साठ्याच्या विल्हेवाटीवरून अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. जप्त केलेली २५२.३८ मेट्रिक टन सुपारी नष्ट केल्याची नोंद करण्यात आली होती, मात्र प्रत्यक्ष विल्हेवाटीबाबत प्रश्न उपस्थित झाल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. याशिवाय अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन छापे टाकणे आणि कारवाईमागे वैयक्तिक हितसंबंध असल्याच्या आरोपांचीही चौकशी सुरू आहे.
निलंबित अधिकाऱ्यांमध्ये नाशिकचे सहआयुक्त अविनाश दाभाडे, अमित रासकर आणि गोपाळ कासार, मुंबईचे सहआयुक्त योगेश देशमुख तसेच धुळे येथील सहाय्यक आयुक्त सुवर्णा महाजन यांचा समावेश आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी या निलंबनाच्या कारवाईला दुजोरा दिला.
एफडीएच्या गुप्तवार्ता विभागाने मालेगाव येथे कारवाई करून ११ ट्रकमधून ३,६०५ पोती सुपारी जप्त केली होती. अन्न विश्लेषणाच्या अहवालात हा साठा खाण्यास अयोग्य असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर न्यायालयाने ४ मार्च २०२५ मध्ये सुपारी नष्ट करण्याचे आदेश दिले, मात्र नोंदींमध्ये साठा नष्ट केल्याचे नमूद असताना प्रत्यक्ष विल्हेवाटीबाबत संशय निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधित कागदपत्रे, नोंदी आणि प्रत्यक्ष कार्यवाहीची पडताळणी सुरू आहे.

वैयक्तिक हितसंबंधांचा आरोप
एफडीएच्या काही अधिकाऱ्यांनी आपले अधिकारक्षेत्र ओलांडून इतर ठिकाणी छापे टाकल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. तसेच काही कारवायांमागे वैयक्तिक हितसंबंध असल्याच्या आरोपांची चौकशी केली जात आहे. या प्रकरणात आणखी २० हून अधिक अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात येण्याची शक्यता आहे. चौकशीत दोष आढळल्यास संबंधितांवरही कारवाई होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर जुहूमध्ये गोळीबाराची माहिती; पोलीस तपास सुरू

Yavatmal News: सोयाबीनने ओलांडला साडेसहा हजारांचा टप्पा; अत्यल्प पावसामुळे घटले उत्पादन, बाजारात आवक कमी

Leopard Attack: नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; सर्वांसमोर नेले उचलून, चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावरुन महाकालीच्या दर्शनासाठी निघाले अन्..

वयाच्या ८८ व्या वर्षीही मर्दानी खेळांचा थरार! शांताबाई पवार यांची प्रेरणादायी कहाणी |Shantabai Pawar

रस्त्याचं काम सुरु असतानाच भरधाव कारची धडक, ८ मजुरांचा जागीच मृत्यू; अनेक जण गंभीर

SCROLL FOR NEXT