नवरात्राेत्सवात हरित संवर्धनाचा जागर
दादर, खेतवाडीत वृक्षदत्तक मोहीम; वृक्षारोपण आणि संवर्धनाचा संदेश
मुंबई, ता. १८ : नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून मुकुंद शेवरे फाउंडेशनतर्फे आयोजित वृक्षदत्तक मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दादर येथील सर्वोदय नवरात्रोत्सव मंडळ आणि खेतवाडी सार्वजनिक उत्सव मंडळ येथे हा उपक्रम राबविण्यात आला. या मोहिमेत विविध वयोगटांतील नागरिकांनी सहभाग घेत वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला.
फाउंडेशनचे संस्थापक डॉ. मुकुंद शेवरे यांनी या उपक्रमाची संकल्पना मांडून त्याची आखणी आणि अंमलबजावणी केली. ‘‘आपण निसर्गातूनच निर्माण झालो आहोत. नवरात्रोत्सवात वृक्षदत्तक उपक्रमाच्या माध्यमातून धरतीरूपी देवीमातेला हिरवी साडी अर्पण करतो. वृक्षारोपण, वृक्षदत्तक आणि वृक्षांचे संवर्धन हीच धरतीमातेची खरी सेवा आहे,’’ असे त्यांनी सांगितले.
माध्यम समन्वयक रेखा जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. शेवरे यांनी नांदगाव येथे २५ हेक्टरपेक्षा अधिक नापीक जमिनीवर जंगल विकसित केले आहे. फाउंडेशनच्या कार्याची दखल घेऊन सरकारने अन्य ठिकाणीही वृक्षारोपणासाठी जमीन उपलब्ध करून देण्याबाबत पुढाकार घेतल्याचे त्यांनी सांगितले.
या मोहिमेत वर्षा गजाकोस, श्रेया कोरगावकर, डॉली शर्मा, भक्ती कदम, धनंजय शेट्टी, जया यादव आणि हर्षित परमार यांच्यासह अनेक स्वयंसेवक सहभागी झाले. पर्यावरण संवर्धनाच्या या उपक्रमात देशभरातील नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. शेवरे यांनी केले.
झाडांची देखभाल
फाउंडेशनच्या स्वयंसेविका वर्षा गजाकोस यांनी दिलेल्या माहितीनुसार, फाउंडेशनतर्फे नापीक जमिनीवर वाढविण्यात आलेल्या झाडांची पाणी आणि खतांसह विशेष पद्धतीने देखभाल केली जाते. या उपक्रमामुळे जागतिक तापमानवाढ कमी करण्यास आणि पाणीटंचाईच्या समस्येवर उपाय शोधण्यास हातभार लागेल, असा विश्वास फाउंडेशनने व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.