उल्हासनगर, ता. १८ (वार्ताहर) : उल्हासनगरमध्ये काही दिवसांपूर्वी विजेचा शॉक लागून मृत्यूमुखी पडलेल्या करिश्मा माधवानी हिच्या कुटुंबाला अखेर न्याय मिळाला आहे. या प्रकरणात मॅट्रिक्स कंपनीच्या संचालकांनी मृत करिश्माच्या कुटुंबाला २० लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
करिश्मा माधवानी हिचा १८ सप्टेंबरला रात्री ११.४५ वाजण्याच्या सुमारास विजेचा शॉक लागल्याने मृत्यू झाला होता. या अकल्पित घटनेमुळे माधवानी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. घटनेनंतर कुटुंबाने सामाजिक कार्यकर्ते शिवाजी रगडे यांची भेट घेऊन मदतीची हाक दिली. त्यानंतर रगडे यांनी तातडीने पुढाकार घेत एफआयआर दाखल करणे, शवविच्छेदन आणि अन्य कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून घेण्यासाठी कुटुंबाला खंबीर साथ दिली. कुटुंबाला योग्य न्याय आणि आर्थिक मदत मिळावी यासाठी पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांच्यासोबत एक महत्त्वाची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला माजी आमदार पप्पू कलानी, ज्येष्ठ नेते नरेंद्र कुमारी ठाकूर, ज्येष्ठ नगरसेवक महेश सुखरामानी, आरोग्य सभापती तथा नगरसेविका सविता तोरणे रगडे, समाजसेवक शिवाजी रगडे यांच्यासह मृत करिश्माचे वडील गुरनमल माधवानी, भाऊ मोहित माधवानी आणि मामा सुनील सचदेव उपस्थित होते.
गोरे यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अत्यंत संवेदनशीलतेने मध्यस्थी केली आणि मॅट्रिक्स कंपनीच्या संचालकांकडे नुकसान भरपाईची मागणी केली. या प्रयत्नांना यश येऊन मॅट्रिक्स कंपनीच्या संचालकांनी कुटुंबाला २० लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यास मंजुरी दिली. आज या संदर्भातील कायदेशीर औपचारिकता पूर्ण करण्यात आल्या असून, येत्या सोमवार किंवा मंगळवारपर्यंत २० लाख रुपयांचा डिमांड ड्राफ्ट माधवानी कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.