मुंबई

बेलापूरमध्ये २५ हून अधिक वृक्षांवर विषप्रयोग

CD

बेलापूरमध्ये २५ हून अधिक वृक्षांवर विषप्रयोग
स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्ष, पर्यावरणप्रेमींची थेट पंतप्रधानांकडे धाव
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १९ : बेलापूरमधील किल्ले गावठाण परिसरात संतापजनक प्रकार समोर आला आहे. येथील २५ हून अधिक वृक्षांना रासायनिक विषप्रयोग केल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, महापालिका मुख्यालय आणि एनआरआय कोस्टल पोलिस ठाण्याच्या नाकाखाली हा प्रकार घडत असूनही सिडको आणि पालिकेच्या संबंधित विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे. याविरोधात अखेर पर्यावरणप्रेमींनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे धाव घेत तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे.
संशयित समाजकंटकांनी भोकर, बदाम, पाम, चिंच आणि बोर यांसारख्या बहुगुणी व जुन्या वृक्षांना लक्ष्य केले आहे. वृक्षांच्या खोडात खोल छिद्रे पाडणे, कुऱ्हाडीने किंवा धारदार शस्त्राने सालीवर जाणीवपूर्वक खोल घाव घालणे आणि त्या छिद्रांमधून रासायनिक विषारी द्रव आत टोचणे, अशी कार्यपद्धती यामागे वापरली जात आहे. काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांनी हे प्रकरण लावून धरल्यानंतर हा प्रकार काही काळ थांबला होता, परंतु प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचे पाहून शनिवारी (ता. १७) पुन्हा नव्याने वृक्षांवर हा विषप्रयोग सुरू केल्याचे चित्र आहे. बाधित वृक्षांच्या खोडातून दुर्गंधीयुक्त द्रव बाहेर येत असून, संपूर्ण परिसरात उग्र वास पसरल्याचे प्रत्यक्ष पाहणीदरम्यान समोर आले आहे. दरम्यान, प्रशासनाने त्वरित रासायनिक तपासणी करून यामागील सूत्रधारांचा शोध घ्यावा आणि या हिरव्या जीवांना वाचवण्यासाठी तज्ज्ञांमार्फत तातडीने उपचार सुरू करावेत, अशी आग्रही मागणी आता जोर धरू लागली आहे.

नागरिकांच्या उपचारांवर पुन्हा विषाचा घाला
१ आज मी या वृक्षांची अवस्था पाहिली, तेव्हा माझ्या डोळ्यांत अश्रू आले, अशा शब्दांत वृक्षसंवर्धक कार्यकर्ते परमदीप गरेवाल यांनी आपली वेदना व्यक्त केली. नॅटकनेक्ट फाउंडेशन, पारसिक ग्रीन्सचे निमंत्रक विष्णू जोशी आणि रहिवाशांनी ७५ हून अधिक नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांसह पालिक आयुक्तांकडे दाद मागितली होती. यासोबतच नागरिकांनी स्वतःचा वेळ, श्रम आणि पैसा खर्च करून वृक्षतज्ज्ञ राजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या झाडांवर उपचार केले होते. मात्र, या प्रयत्नांवर पुन्हा एकदा विषाचा घाला घातला गेल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
२ नॅटकनेक्टचे संचालक बी. एन. कुमार यांनी महापालिकेच्या उद्यान विभागाने केवळ वरवरचा चुना लावून आपली जबाबदारी झाडून टाकली आहे. एवढा मोठा कट सुरु असताना हे लहान मुलांचे खोडकरपण असू शकते, असे उत्तर देऊन पोलिस आणि प्रशासन गंभीर तपासण्यापासून पळ काढत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election Result 2026 : एकटा बास! मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ३ मंत्री, २ खासदार, १० आमदारांना पुरून उरले सतेज पाटील; वाचा विजयी उमेदवारांची फायनल यादी

Parenting style: पालकांनो सावधान! तुमच्या 'या' एका चुकीमुळे मूल जाऊ शकतं नैराश्यात; १५ वर्षांच्या अभ्यासातून खुलासा...

Latest Marathi News Live Update : प्यारे खान यांच्या भेटीनंतर गरबा मंडळाचं शुद्धीकरण

Sawai Gandharva Bhimsen Festival : यंदाचा ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ १३ ते १७ जानेवारीमध्ये; प्रथमच फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजन

Gokul Election Satej Patil : गोकुळच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ; सतेज पाटील यांची तातडीने धाव अभिजित तायशेटे आणि अधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी

SCROLL FOR NEXT