मुंबई

उल्हासनगरमध्ये १०९ मतदारांना नोटिसाच नाहीत!

CD

उल्हासनगर, ता. १९ (वार्ताहर) : उल्हासनगरमध्ये मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तब्बल १०९ मतदारांना नोटिसा बजावण्यात आल्या नसल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. प्रशासनाच्या हलगर्जीमुळे मतदारांच्या हक्कांवर गदा येण्याची भीती व्यक्त करत काँग्रेसने तहसीलदारांकडे लेखी तक्रार केली आहे. तातडीने कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेत १०९ मतदारांना नोटिसा वितरित केल्या नाहीत. याप्रकरणी उल्हासनगर काँग्रेस कमिटीचे ब्लॉक क्रमांक चारचे अध्यक्ष पवन मिरानी यांनी तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे. बूथ लेव्हल अधिकारी तेजस जाधव यांना १०९ नोटिसा प्राप्त झाल्या होत्या. मात्र, एकही नोटीस संबंधित मतदारांपर्यंत पोहोचविण्यात आली नसल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. यासंदर्भात सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी सलोनी निमकर यांच्या उपस्थितीत झालेल्या कॉन्फरन्स कॉलमध्ये गैरसमजुतीमुळे हा प्रकार घडल्याचे सांगत दोन दिवसांत नोटिसा वितरित करण्याचे आश्वासन दिल्याचे मिरानी यांनी म्हटले आहे. 

२६ ऑक्टोबरपर्यंत हरकती नोंदवा
दावे आणि हरकती नोंदविण्याची अंतिम मुदत २६ ऑक्टोबर असून, नोटिसांच्या निपटाऱ्यासाठी १० नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. त्यामुळे संबंधित मतदारांना आपली बाजू मांडण्याची संधी मिळणार का, असा सवाल उपस्थित झाला आहे. सर्व नोटिसा २४ ते ४८ तासांत वितरित कराव्यात, संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी आणि मतदारांना पुरेसा वेळ द्यावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election Satej Patil : गोकुळच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ; सतेज पाटील यांची तातडीने धाव अभिजित तायशेटे आणि अधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी

Gold For India : अचूक निशाणा अन् नवा इतिहास! पॅरा नेमबाज मोना अग्रवालने जिंकलं 'सुवर्णपदक'; पंतप्रधानांची भावूक पोस्ट

Asian Para Games 2026: भारतीय खेळाडूंचा ऍथलेटिक्समध्ये सुवर्ण व रौप्य पदकांचा 'डबल धमाका'! सौम्या, राधा अन् रिंकू-अजीतची कमाल

आजोबांनी आजीसाठी १९६४ मध्ये लिहिलं ८ फूट लांबीचं प्रेमपत्र! ६२ वर्षांनंतरही होतेय प्रेमाची चर्चा; VIDEO VIRAL

Latest Marathi News Live Update : बंटी पाटलांचा महायुतीला दणका! गोकुळ दूध संघ निवडणुकीत समविचारी आघाडीची सत्ता स्थापनेकडे वाटचाल

SCROLL FOR NEXT