मुंबई

एलएलबी प्रवेशात मुलींचा टक्का वाढला

CD

एलएलबी प्रवेशात मुलींचा टक्का वाढला
यंदा प्रमाण ४३.३८ टक्क्यांवर

मुंबई, ता. १९ : मुलींना विविध प्रकारच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांचे पदवी, पदव्युत्तर आदींचे शिक्षण मोफत उपलब्ध करून दिले जात आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षात एलएलबीच्या पाचवर्षीय विधी अभ्यासक्रमात तब्बल १८ टक्क्यांहून अधिक मुलींनी प्रवेश घेतला आहे. विधीच्या या प्रवेशांत मुलींची संख्या वाढल्याने यासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रवेशाचे स्वागत केले आहे.

राज्य शासनाने ऑगस्ट २०२४ मध्ये मुलींसाठी शैक्षणिक व परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामागे मंत्री पाटील यांचा सातत्यपूर्ण आग्रह होता. राज्यात एकही मुलगी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये, या भूमिकेतून सुरू करण्यात आलेल्या मुलींच्या मोफत शिक्षण योजनेला आता राज्यभर मोठे बळ मिळत असल्याचे विधी प्रवेशाच्या आकडेवारीवरून दिसून आले आहे. उच्च शिक्षण संचालनालयांतर्गत झालेल्या तीनवर्षीय आणि पाचवर्षीय विधी (एलएलबी) अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत मुलींचा सहभाग लक्षणीय वाढला आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये विधी अभ्यासक्रमांत १३,५२१ मुलींनी प्रवेश घेतला होता. त्या वेळी एकूण प्रवेशांत मुलींचे प्रमाण ४०.७५ टक्के होते. २०२६-२७ मध्ये ही संख्या १४,७६१ वर पोहोचली असून, हे प्रमाण ४३.३८ टक्के झाले आहे.
तीनवर्षीय एलएल. बी. अभ्यासक्रमात मुलींची संख्या ८,०७१ वरून ८.३४८ झाली आहे. पाचवर्षीय एलएल.बी. अभ्यासक्रमात मोठी वाढ दिसते. तिथे संख्या ५,४५० वरून थेट ६,४१३ वर गेली आहे. बारावीनंतर लगेचच विधी क्षेत्राला करिअर म्हणून निवडणाऱ्या मुलींची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे यातून स्पष्ट होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bishnoi Gang Update : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणानंतर मोठी खळबळ; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या निशाण्यावर होते 'हे' काँग्रेसचे माजी आमदार!

Bhagwangad News : भगवानगडाच्या चतुर्थ महंतपदी कृष्णा महाराज शास्त्री विराजमान होणार; दुष्काळामुळे सोहळा साधेपणाने

Law Courses : विधी अभ्यासक्रमाला मुलींची पसंती; प्रवेशाचे प्रमाण ४३.३८ टक्क्यांवर

IND vs NZ, Schedule: भारताचा T20 संघ न्यूझीलंडला पोहोचला! वैभव सूर्यवंशीसोबत फॅन्सने घेतले सेल्फी, भुवीही कमबॅकसाठी सज्ज

Latest Marathi News Live Update : गोकुळचा निकाल आता फेरमतमोजणीच्या फेऱ्यात, जल्लोषानंतर आकडे बदलले; लेटेस्ट अपडेट वाचा

SCROLL FOR NEXT