मुंबई

ऋषिकाची सौंदर्यस्पर्धेत बाजी

CD

ऋषिकाची सौंदर्यस्पर्धेत बाजी

‘बेस्ट कॉस्च्युम’मध्ये प्रथम

जोगेश्वरी, ता.१९(बातमीदार) : भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारी पारंपरिक वेशभूषा आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाच्या जोरावर अवघ्या १० वर्षांच्या ऋषिका जाधव हिने ‘कला सुंदरी ब्युटी पेजंट सीझन २’ या सौंदर्यस्पर्धेत दुहेरी यश संपादन केले. ‘बेस्ट कॉस्च्युम’ प्रकारात प्रथम क्रमांक पटकावण्यासह तिने संपूर्ण स्पर्धेत ‘फर्स्ट रनर-अप’चा मान मिळवला. ऋषिकाच्या या यशामुळे जाधव कुटुंबीयांसह परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

रविवार, ४ ऑक्टोबर रोजी आयोजित या स्पर्धेत ऋषिकाने भारतीय संस्कृतीवर आधारित पारंपरिक वेशभूषा साकारली. तिचे सादरीकरण, आत्मविश्वास आणि वेशभूषेने परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले. यामुळे तिला ‘बेस्ट कॉस्च्युम’ प्रकारात प्रथम क्रमांक मिळाला. तसेच स्पर्धेतील एकूण कामगिरीच्या जोरावर तिने ‘फर्स्ट रनर-अप’चे स्थान मिळवले.

ऋषिकाची आई सुनीता जाधव या मेघवाडी पोलीस ठाण्यात महिला पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत. कर्तव्य बजावत असतानाच त्यांनी मुलीच्या कलागुणांना प्रोत्साहन दिले. ऋषिकाने आपल्या सादरीकरणातून भारतीय संस्कृतीची झलक दाखवत मिळवलेले यश तिच्या कलात्मकतेची आणि आत्मविश्वासाची पोचपावती ठरले आहे. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कुटुंबीय, नातेवाईक आणि परिचितांकडून कौतुक केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP च्या नेत्यांच्या अडचणीत वाढ; जंतरमंतर आंदोलन प्रकरणी आशुतोष रांका आणि सौरव दास यांना न्यायालयीन धक्का!

Tiger Shroff Firing Case : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील आरोपींना पकडणाऱ्या कोण आहेत आयपीएस तेजस्विनी गौतम?

Rain Update : दक्षिण भारतात मुसळधार पावसाचा हाय अलर्ट! तर महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी!

Bishnoi Gang Update : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणानंतर मोठी खळबळ; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या निशाण्यावर होते 'हे' काँग्रेसचे माजी आमदार!

Latest Marathi News Live Update : महायुतीला धक्का! फेरमतमोजणीची मागणी फेटाळली, सतेज पाटलांच्या समविचारी १३ तर महायुतीला १२ जागा

SCROLL FOR NEXT