विद्यार्थ्यांची कराटेत पदकांची लयलूट
जागतिक स्पर्धेत चमकदार कामगिरी
जोगेश्वरी, ता.१९ (बातमीदार) : आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत जोगेश्वरी येथील आरजेएमडीएस इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याची छाप उमटवत घवघवीत यश संपादन केले. पुण्यातील बालेवाडी येथे झालेल्या आठव्या जागतिक गोजु-र्यू चॅम्पियनशिप २०२६ मध्ये शाळेच्या १० विद्यार्थ्यांनी तब्बल २१ पदकांवर नाव कोरले. यात १० सुवर्ण, ९ रौप्य आणि २ कांस्यपदकांचा समावेश आहे. १८ देशांतील खेळाडू सहभागी झालेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी केलेल्या दमदार कामगिरीमुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील यशात आणखी भर पडली. बालविकास विद्यामंदिराच्या दोन विद्यार्थ्यांनीही या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले.
स्पर्धेत मोक्षदा शेळके हिने तीन सुवर्ण आणि एक रौप्यपदक जिंकत लक्षवेधी कामगिरी केली. अर्णव शेळके याने एक सुवर्ण व दोन रौप्यपदके, तर गार्गी धन्वी हिने दोन सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्यपदक पटकावले. शंभूराज जंगम आणि तन्मय परब यांनी प्रत्येकी एक सुवर्णपदक मिळवले. वेदांत गिरी याने एक सुवर्ण व दोन रौप्यपदकांची कमाई केली. यशवंत देसाई आणि शुधेशना कुवारे यांनी प्रत्येकी एक रौप्यपदक, अथर्व रंगाडे याने एक सुवर्णपदक, तर अक्षर पालव याने दोन रौप्य आणि एक कांस्यपदक जिंकले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.