मुंबई

केईएममध्ये उद्या माइंडफुलनेस दिन

CD

केईएममध्ये आज माइंडफुलनेस दिन

मुंबई, ता. १९ : परळ येथील केईएम रुग्णालयाच्या एम. एल. टी. हॉलमध्ये मुंबईच्या आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिक, शिक्षणतज्ज्ञ आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांमध्ये मानसिक लवचिकता, भावनांवर नियंत्रण आणि सर्वांगीण आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी प्रोएक्ट माईंडतर्फे बुधवारी (ता.२०) सकाळी दहा वाजता ‘जागतिक माइंडफुलनेस दिवस’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी महापालिकेचे उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघाडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यशाळेत ज्येष्ठ मनोविकास तज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे यांचे विशेष व्याख्यान होणार आहे. या उपक्रमाबाबत जी. एस. वैद्यकीय महाविद्यालय आणि के. ई. एम. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हरीश पाठक म्हणाले की, ‘विद्यार्थी, वैद्यकीय व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न आजच्या काळातील एक मोठे आव्हान बनला आहे. या विषयाकडे प्राधान्याने आणि तातडीने लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे.’ प्रोऍक्ट माईंडचे वरिष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अनुपम बोराडे यांनी सांगितले की, ‘आपण आपल्या व्यावसायिक आयुष्यात इतरांच्या आरोग्याची काळजी घेतो आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो. परंतु स्वतःसाठी थोडा वेळ काढून मानसिक ऊर्जा पुन्हा मिळवणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.’ दरम्यान या सोहळ्यात डॉक्टरांनी, विद्यार्थ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मानसिक आरोग्य या विषयाचा प्रचार आणि प्रसार करावा, असे आवाहन प्रोएक्ट माईंडचे संस्थापक मिलिंद जाधव यांनी केले आहे.

Dasara Melava 2026: संजय राऊतांचा अमित शाहांवर हल्लाबोल; 'लॉरेन्स बिश्नोई अस्तित्वात नाही, अमित शाह हेच लॉरेन्स बिश्नोई'

Eknath Shinde : "शेतकऱ्यांच्या लेकींच्या लग्नाचा सर्व खर्च आमचा"; दसरा मेळाव्यातून एकनाथ शिंदेंची सर्वात मोठी घोषणा!

INDW vs ZIMW 3rd T20I: १० चौकार, ५ षटकार अन् ९१ धावा! हरमनप्रीत कौर रडली, चेहरा लपवताना दिसली; म्हणाली, त्या शब्दांनी...

Latest Marathi News Live Update : जाणून घ्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

Dasara Melava : दसरा मेळाव्यात राजकीय रणसंग्राम; मनोज जरांगे आणि रामदास कदम यांच्यातील वाद विकोपास!

SCROLL FOR NEXT