मुंबई

एनटीसी कामगारांचे प्रश्न केंद्रासमोर मांडणार

CD

एनटीसी कामगारांचे प्रश्न केंद्रासमोर मांडणार
सचिन अहिर यांची ग्वाही; राष्ट्रीय मिल मजदूर संघाचा वर्धापन दिन उत्साहात
शिवडी, ता. २० (बातमीदार) ः पदाचा उपयोग आपण कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी निश्चितपणे करू, अशी ग्वाही महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी कामगारांच्या दसरा मेळाव्यात बोलताना दिली. एनटीसी गिरणी कामगारांचे प्रश्न येत्या नोव्हेंबरमध्ये केंद्र सरकारसमोर मांडू, असा शब्‍द सचिन अहिर यांनी आपल्या भाषणात दिला.
राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या संयुक्त विद्यमाने, संघटनेचा ७९वा वर्धापन दिन सोहळा‌ आणि दसरा संमेलन विजयादशमीच्या पूर्वसंध्येला सोमवारी (ता. १९) मनोहर मामा फाळके सहभागृहात मोठ्या थाटामाटात पार पडला. त्या वेळी उपसभापती सचिन अहिर हे मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. प्रारंभी सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी संघटनेच्या वर्धापनदिना मागील इतिहास सांगितला.
राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने एनटीसी गिरणी कामगारांच्या थकीत पगारासाठी महिन्यापेक्षा अधिक काळ साखळी उपोषण सुरू आहे, त्याला काही तांत्रिक अडचणीमुळे भेट देता आली नाही. तथापि या प्रश्नावर म्हटल्याप्रमाणे निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत, असे सांगून उपसभापती सचिन अहिर म्हणाले, हा प्रश्न देशातील बंद एनटीसी गिरण्यांशी निगडित आहे, त्याकडे सरकारचे लक्ष वेधवे लागेल. संघाचे उपाध्यक्ष सुनील बोरकर यांनी आपल्या भाषणात एनटीसी कामगारांच्या उपासमारीवर माहिती दिली. खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष अण्णा शिर्सेकर, बजरंग चव्हाण, सेक्रेटरी शिवाजी काळे, ऐश्वर्या ‌अहिर, राजन लाड, उत्तम गीते, मिलिंद तांबडे, दीपक पेडणेकर, नितीन तिर्लोटकर, विवेक जाधव, सहकार भंडाराच्या माधुरी सावंत आदी विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते त्यावेळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke: आंदोलनाबाबत अभिजीत दिपकेंची मोठी घोषणा! आता दिवाळीपर्यंत...

मी अजूनची चांगल्या फॉर्मात आहे, मग भारतीय संघात पुनरागमनाची आशा का सोडू? मोहम्मद शमीचं विधान चर्चेत...

Space War : मोबाईलचे जाळे आणि जीपीएस होणार गुल? अवकाशातील वाढत्या संघर्षामुळे जगासमोर मोठे संकट!

Latest Marathi News Live Update : धनंजय मुंडेंचा फार सहन केलं, 'अब हवा का रुख बदल रहा है' म्हणत कोणाला इशारा?

PAK vs ENG : बाबर आझम पुन्हा फेल गेला... पण, एक असा विक्रम ज्यात शुभमन गिलच्या पंक्तीत जाऊन बसला; Video

SCROLL FOR NEXT