मुंबई

तळोजा एमआयडीसीत डिझेल चोरांचा धुमाकूळ!

CD

तळोजा एमआयडीसीत डिझेल चोरांचा धुमाकूळ
दोन वेगवेगळ्या घटनांत ६२० लिटर डिझेलची चोरी; पोलिसांत गुन्हे दाखल
पनवेल, ता. २० (बातमीदार) ः तळोजा एमआयडीसी क्षेत्रात रस्त्याकडेला उभ्या असलेल्या वाहनांमधून डिझेल चोरीच्या दोन वेगवेगळ्या घटना उघडकीस आल्या आहेत. या दोन्ही घटनांमध्ये चोरट्यांनी तब्बल ६२० लिटर डिझेल चोरून नेले असून, याप्रकरणी तळोजा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
पहिल्या घटनेत विकी साहू यांनी तळोजा एमआयडीसी परिसरातील फोर ट्रेन स्टील कंपनीसमोरील रस्त्यावर आपले वाहन पार्क केले होते. या वेळी एका व्यक्तीने वाहनाच्या डिझेल टँकमधून तब्बल २२० लिटर डिझेल चोरून नेले. ही घटना उघडकीस आल्यानंतर याप्रकरणी १८ ऑक्टोबर रोजी तळोजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दुसऱ्या घटनेत इंद्रेश साहू यांनी तळोजा एमआयडीसी परिसरात आपला १८ चाकी ट्रेलर उभा केला होता. यामधून चोरट्याने ४०० लिटर डिझेल चोरले. चोरी झालेल्या डिझेलची किंमत सुमारे ३९ हजार रुपये असल्याचे नमूद केले आहे. याप्रकरणी १६ ऑक्टोबर रोजी तळोजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही घटनांमध्ये मिळून ६२० लिटर डिझेलची चोरी झाली आहे. औद्योगिक क्षेत्रात रस्त्याच्या कडेला किंवा मोकळ्या जागेत उभ्या असलेल्या अवजड वाहनांना चोरटे लक्ष्य करत असल्याचे या घटनांवरून समोर आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कितीही दरोडेखोर आले तरी आमचा भगवा कोणीही चोरू शकत नाही; दसऱ्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

"आम्हाला पक्षाचे संख्याबळ वाढवून एकनाथ शिंदेंना पुन्हा सिंहासनावर बसवायचे आहे"; शिवसेनेच्या नेत्यांचे मोठे विधान!

रामराज्य म्हणजे नेमकं काय? विजयादशमीच्या भाषणात पंतप्रधान मोदींनी सांगितला अर्थ

टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणात मोठा खुलासा! आधी दुसऱ्या सेलिब्रिटीला संपवण्याचा होता प्लॅन, चौकशीत काय समोर आलं?

Dussehra Shopping: आज दसरा ;वाहन, सोने, गृह, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे खरेदीवर ग्राहकांचा भर १,२०० कोटींची उलाढाल अपेक्षित

SCROLL FOR NEXT