मुंबई

४.१९ कोटींचा संशयास्पद अन्नसाठा जप्त

CD

४.१९ कोटींचा संशयास्पद अन्नसाठा जप्त
दोन शीतगृहांवर एफडीएची धडक; परवाने निलंबित
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : सणासुदीच्या काळात अन्नपदार्थांची मागणी वाढत असतानाच अन्न व औषध प्रशासनाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन शीतगृहांवर कारवाई करीत तब्बल एक लाख ९७ हजार ४८० किलो वजनाचा संशयास्पद अन्नसाठा जप्त केला आहे. या साठ्याची किंमत चार कोटी १९ लाख रुपयांहून अधिक असून, दोन्ही शीतगृहांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. जप्त अन्नपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.

‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत ही कारवाई करण्यात आली. पैठण तालुक्यातील बिडकीन येथील मे. ओ वेअरहाउसिंग प्रा. लि. या शीतगृहातून एक लाख ६५ हजार ८०५ किलो मिरची पावडर आणि मनुका जप्त करण्यात आल्या. त्यांची किंमत तीन कोटी ८९ लाख ४० हजार रुपये आहे. यात एक लाख २५ हजार ६४८ किलो विनालेबल मिरची पावडरचा समावेश आहे. तर गंगापूर तालुक्यातील शिवराई येथील मे. मराठवाडा कोल्ड स्टोअरेज प्रा. लि. येथून गूळ, मनुका आणि बटर असा ३१ हजार ६७५ किलो साठा जप्त करण्यात आला. त्याची किंमत ३० लाख सात हजार रुपये आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील चाकण आणि निघोजे येथील दोन आस्थापनांचे परवानेही निलंबित करण्यात आले असून, संबंधित प्रकरणांत पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सणासुदीच्या काळात शीतगृहे आणि गोदामांवरील तपासणी राज्यभर सुरू राहणार असल्याचे एफडीएने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dasara Melava 2026: संजय राऊतांचा अमित शाहांवर हल्लाबोल; 'लॉरेन्स बिश्नोई अस्तित्वात नाही, अमित शाह हेच लॉरेन्स बिश्नोई'

Eknath Shinde : "शेतकऱ्यांच्या लेकींच्या लग्नाचा सर्व खर्च आमचा"; दसरा मेळाव्यातून एकनाथ शिंदेंची सर्वात मोठी घोषणा!

INDW vs ZIMW 3rd T20I: १० चौकार, ५ षटकार अन् ९१ धावा! हरमनप्रीत कौर रडली, चेहरा लपवताना दिसली; म्हणाली, त्या शब्दांनी...

Latest Marathi News Live Update : जाणून घ्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

Dasara Melava : दसरा मेळाव्यात राजकीय रणसंग्राम; मनोज जरांगे आणि रामदास कदम यांच्यातील वाद विकोपास!

SCROLL FOR NEXT