तेरा वर्षीय मुलीचा उपचारानंतर मृत्यू
रुग्णालयावर हलगर्जीचा आरोप
मुंबई, ता. २० : जोगेश्वरी येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (एचबीटी) रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर १३ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. या प्रकरणात मुलीच्या वडिलांनी वैद्यकीय उपचारात हलगर्जी झाल्याचा आरोप करीत चौकशीची मागणी केली आहे. महापालिकेने या प्रकरणाची चौकशी केली असून, कूपर रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकानेही घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. मात्र, चौकशीचा अंतिम अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. दरम्यान, याविषयी ट्रामा रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. छाया शिंदे यांनी बोलण्यास नकार दिला.
जिया गौतम ही गोरेगावची रहिवासी होती. तिचे वडील राकेश कुमार गौतम यांच्या म्हणण्यानुसार, ८ ऑक्टोबरला तिला सौम्य ताप आला. खासगी प्रयोगशाळेच्या तपासणीत डेंगी असल्याचे निदर्शनास आल्यानंतर १० ऑक्टोबरला सकाळी ते मुलीला रुग्णालयात घेऊन गेले. तपासणीचा अहवाल डॉक्टरांना दाखवूनही मुलीची प्रकृती गंभीर नसल्याचे सांगण्यात आले आणि तिला दाखल करून घेण्यात आले नाही. तिला सलाईन आणि दोन इंजेक्शने देऊन पाच दिवसांची औषधे लिहून घरी पाठविण्यात आले. घरी गेल्यानंतर अवघ्या १५ ते २० मिनिटांत जियाची प्रकृती अचानक खालावली, तेव्हा तिला पुन्हा रुग्णालयात आणले. सकाळी साडेअकराच्या सुमारास तिला दाखल करण्यात आले. मात्र, सायंकाळी पाचच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. मुलीच्या प्रकृतीबाबत कुटुंबीयांना स्पष्ट माहिती देण्यात आली नसल्याचा आरोपही वडिलांनी केला आहे. उपचारांशी संबंधित मूळ कागदपत्रे रुग्णालयाकडे ठेवण्यात आल्याचा त्यांचा दावा आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
...
अहवालाची प्रतीक्षा
रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, घटनेनंतर कूपर रुग्णालयातील डॉक्टरांचे पथक जोगेश्वरीतील रुग्णालयात गेले होते. त्यांनी उपचारांची माहिती आणि घटनेच्या परिस्थितीची चौकशी केली असून, अंतिम अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहे. रुग्णालय प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, मुलगी पहिल्यांदा रुग्णालयात आली तेव्हा खासगी प्रयोगशाळेचा अहवाल अद्याप उपलब्ध झाला नव्हता. तसेच घरी गेल्यानंतर तिची प्रकृती अधिक बिघडल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.