मुंबई

महसूल सेवक भरतीत उमेदवारांची गर्दी

CD

महसूल सेवक भरतीत उमेदवारांची गर्दी
११ जागांसाठी १५१ अर्ज; दोन प्रवर्गांत प्रतिसाद शून्य
मुरूड, ता. २० (बातमीदार) : मुरूड तालुक्यात महसूल सेवक (कोतवाल) सरळसेवा भरती २०२६ अंतर्गत ११ पदांसाठी १५१ अर्ज दाखल झाले आहेत, मात्र सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय (एसईबीसी) आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) या दोन प्रवर्गांतील पदांसाठी एकही अर्ज प्राप्त झालेला नाही. अर्जांची छाननी २१ ते ३० ऑक्टोबरदरम्यान होणार असून, १५ नोव्हेंबर रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे.
मुरूड तहसील कार्यालयामार्फत ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील सर्वसाधारण एका आणि महिला एका अशा दोन पदांसाठी २५ अर्ज प्राप्त झाले आहेत. भटक्या जाती (ब) प्रवर्गातील सर्वसाधारण एका पदासाठी पाच उमेदवारांनी अर्ज केले आहेत.
इतर मागासवर्गीय (इमाव) प्रवर्गातील सर्वसाधारण एका पदासाठी ४८ अर्ज दाखल झाले आहेत. खुल्या अथवा अराखीव प्रवर्गातील सर्वसाधारण तीन आणि महिला एका अशा चार पदांसाठी ७३ अर्ज प्राप्त झाले आहेत. एसईबीसी प्रवर्गातील सर्वसाधारण एका पदासाठी, तर ईडब्ल्यूएस प्रवर्गातील दोन पदांसाठी एकही अर्ज आलेला नाही.

परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
प्राप्त अर्जांची २१ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत छाननी करण्यात येणार आहे. त्यानंतर १५ नोव्हेंबर रोजी परीक्षा होणार असल्याची माहिती मुरूडचे तहसीलदार आदेश डफळ यांनी दिली. भरतीसाठी प्राप्त अर्जांची प्रवर्गनिहाय माहिती तहसीलदार कार्यालयातर्फे साहिल साळुंखे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke: आंदोलनाबाबत अभिजीत दिपकेंची मोठी घोषणा! आता दिवाळीपर्यंत...

शिवा शर्मा हत्याकांड: लखनऊमधून फरार झालेली श्रद्धा दुबे नागपुरात सापडली; बहीण अन् चालकही अटकेत, ११ दिवस पोलिसांना गुंगारा

Team India : जसप्रीत बुमराहने २०२७ च्या वन डे वर्ल्ड कपपर्यंत सर्व फॉरमॅटमध्ये खेळू नये! कुणी दिलाय हा सल्ला?

Latest Marathi News Live Update : ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात प्रदीप पूर्णेकरांचे पुत्र राम पूर्णेकरांची उपस्थिती

‘हा सोनू, हा मोनू’; संताच्या मांडीवर डोकं ठेवून बिस्किटं खातात दोन अस्वल, VIDEO पाहून नेटकरी थक्क

SCROLL FOR NEXT