मुंबई

३६७ मशालींनी उजळला प्रतापगड

CD

३६७ मशालींनी उजळला प्रतापगड
१७ व्या वर्षात महोत्सवाचे दिमाखात आयोजन
पोलादपूर, ता. २० (बातमीदार) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची आणि स्वराज्याच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या ऐतिहासिक किल्ले प्रतापगडावर ३६७ मशाली प्रज्वलित करून मशाल महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. गडाच्या तटबंदीवर उजळलेल्या मशालींनी संपूर्ण परिसर प्रकाशमय झाला. हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती.
छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६१ मध्ये प्रतापगडावर श्री भवानी मातेची स्थापना केली. या मंदिराला साडेतीनशे वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने २०१० मध्ये कट्टर शिवभक्त आणि शिवकालीन खेडे गावचे संस्थापक आप्पासाहेब उतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मशाल महोत्सवाची सुरुवात झाली. सुरुवातीला साडेतीनशे मशाली प्रज्वलित करून सुरू झालेल्या या उपक्रमाने यंदा १७व्या वर्षात पदार्पण केले.
यंदाच्या महोत्सवात गडाच्या तटबंदीवर तब्बल ३६७ मशाली पेटविण्यात आल्या. अंधारात उजळलेली तटबंदी आणि मशालींच्या प्रकाशात खुलून दिसणारे गडाचे ऐतिहासिक रूप उपस्थितांसाठी विशेष आकर्षण ठरले. या विहंगम दृश्याने शिवभक्तांना ऐतिहासिक वैभवाची अनुभूती दिली.
मशाल महोत्सवाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमी इतिहास, गड-किल्ल्यांचे महत्त्व आणि स्वराज्याच्या स्मृती नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरवर्षी या सोहळ्याबद्दल शिवभक्तांमध्ये आकर्षण वाढत असून, यंदाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

स्वराज्याच्या स्मृतींना उजाळा
मशालींच्या प्रकाशात न्हाऊन निघालेला प्रतापगड, ऐतिहासिक तटबंदीचे देखणे रूप आणि शिवभक्तांचा उत्स्फूर्त सहभाग यांमुळे महोत्सव संस्मरणीय ठरला. ऐतिहासिक वारशाचे जतन आणि शिवरायांच्या पराक्रमाची आठवण नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने या उपक्रमाला विशेष महत्त्व आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MBBSनंतर IPS झाले, पुढे एक वर्षात IAS बनले; आता राज्यातून केंद्रात मोठी जबाबदारी, २ अधिकाऱ्यांची बदली

ना कोणता आजार, ना प्रकृतीची तक्रार! गरबा खेळताना ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू; छातीत अचानक कळ आली अन्...

Pradeep Purnekar Case: टल्ली, पपलूच्या कोठडीत तीन दिवसांची वाढ, गुन्ह्यातील शस्त्रे, हेल्मेटचा शोध; तपासातील गोपनीय नोंदीने चर्चेला उधाण

Dussehra 2026: दसऱ्याला सोनं म्हणून आपट्याचीच पानं का देतात? राजा रघु आणि कुबेराची ही पौराणिक कथा जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : शिक्षक व पदवीधर निवडणुकीसाठी मतदानाची सवलत; शासकीय कर्मचाऱ्यांना भरपगारी रजा!

SCROLL FOR NEXT