अर्धवट अंडरपासमुळे ओवळेकर संतप्त
१५ दिवसांत उपाययोजना करण्याची मागणी
पनवेल, ता. २० (बातमीदार) : नवीन ओवळे सेक्टर १ येथील मुख्य रस्त्यावरील अंडरपासचे काम अर्धवट राहिल्याने वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका वाढला आहे. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ॲड. विक्रांत घरत यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी रस्त्यावर बसून निषेध आंदोलन केले. संबंधित यंत्रणांनी १५ दिवसांत ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरचे काम पूर्ण झाले असले, तरी अंडरपासचे काम अपूर्ण असून, वाहतुकीसाठी एकच मार्ग उपलब्ध आहे. त्यामुळे परिसरात वाहनांची गर्दी होऊन वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. गेल्या दोन महिन्यांत या ठिकाणी अनेक अपघात झाले असून, काही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती ॲड. घरत यांनी दिली.
अवजड वाहने आणि भरधाव दुचाकींमुळे शाळकरी विद्यार्थी व नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सिडको, भारतीय रेल्वे आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.
आंदोलनाचा इशारा
अपघातांचा धोका कमी करण्यासाठी संबंधित मार्गावर तातडीने गतिरोधक बसवावेत आणि अंडरपासचे काम पूर्ण करून वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. सिडको, रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि वाहतूक पोलिसांनी समन्वय साधून १५ दिवसांत समस्येवर ठोस तोडगा काढावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. निर्धारित मुदतीत कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. या निषेध आंदोलनात ग्रामस्थ, तरुण आणि विद्यार्थी सहभागी झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.