मुंबई

गॅस तपासणी शुल्काविरोधात संताप

CD

गॅस तपासणी शुल्काविरोधात संताप
रक्कम माफ करण्याची कविता पाटील यांची मागणी; ग्राहकांना शुल्क न भरण्याचे आवाहन
उरण, ता. २० (बातमीदार) : बीपीसीएलच्या घरगुती गॅस जोडणी सुरक्षा तपासणीच्या नावाखाली ग्राहकांकडून सरसकट २३६ रुपये शुल्क आकारले जात असल्याचा आरोप उरण पंचायत समितीच्या सदस्या कविता रूपेश पाटील यांनी केला आहे. ही शुल्क आकारणी तत्काळ थांबवून तपासणी मोफत करावी आणि ग्राहकांना घरपोच सिलिंडर सेवा द्यावी, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
गॅस जोडणी तपासणीसाठी शुल्क आकारण्याबरोबरच रबरी नळी आणि अन्य उपकरणांसाठी अतिरिक्त पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी ग्राहकांनी पाटील यांच्याकडे केल्या होत्या. याप्रकरणी त्यांनी उरणचे तहसीलदार उद्धव कदम आणि भारत पेट्रोलियमचे विक्री अधिकारी राहुलकुमार कन्नोजिया यांच्याशी संपर्क साधला. सुरक्षा तपासणी दर पाच वर्षांनी एकदा करणे अनिवार्य असल्याचे कन्नोजिया यांनी सांगितले. शुल्क माफ करण्याची मागणी पेट्रोलियम मंत्रालयापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
महागाईच्या काळात ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार टाकणे योग्य नसल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. मुदतबाह्य किंवा खराब उपकरणांसाठी शुल्क आकारण्यास हरकत नसली, तरी सर्व ग्राहकांकडून तपासणीच्या नावाखाली सरसकट शुल्क वसूल करू नये, अशी त्यांची भूमिका आहे. ग्राहकांनी तपासणी शुल्क भरू नये, असे आवाहनही त्यांनी केले. शिवसेनेचे ॲड. पर्जन्य म्हात्रे, नीरज पाटील, विपुल म्हात्रे आणि सामाजिक कार्यकर्ते निलेश म्हात्रे यांनीही शुल्क आकारणीला विरोध दर्शविला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke: आंदोलनाबाबत अभिजीत दिपकेंची मोठी घोषणा! आता दिवाळीपर्यंत...

मी अजूनची चांगल्या फॉर्मात आहे, मग भारतीय संघात पुनरागमनाची आशा का सोडू? मोहम्मद शमीचं विधान चर्चेत...

Space War : मोबाईलचे जाळे आणि जीपीएस होणार गुल? अवकाशातील वाढत्या संघर्षामुळे जगासमोर मोठे संकट!

Latest Marathi News Live Update : धनंजय मुंडेंचा फार सहन केलं, 'अब हवा का रुख बदल रहा है' म्हणत कोणाला इशारा?

PAK vs ENG : बाबर आझम पुन्हा फेल गेला... पण, एक असा विक्रम ज्यात शुभमन गिलच्या पंक्तीत जाऊन बसला; Video

SCROLL FOR NEXT