मुंबई

२१ वर्षांनंतर आयुक्तांच्या बंगल्याचे स्वप्न साकार!

CD

२१ वर्षांनंतर आयुक्तांच्या बंगल्याचे स्वप्न साकार!
बांधकामाला गती देण्यासाठी ठेकेदाराला नोटीस
सकाळ वृत्तसेवा
उल्हासनगर, ता. २० : उल्हासनगर महापालिकेच्या अर्थसंकल्पात गेल्या २१ वर्षांपासून तरतूद होऊनही प्रत्यक्षात साकार न झालेल्या आयुक्तांच्या बंगल्याचे स्वप्न आता पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. अनेक वर्षे कागदावरच राहिलेल्या या प्रकल्पाचे बांधकाम मागील वर्षी सुरू झाले. मात्र, कामाला अपेक्षित गती मिळत नसल्याने ते लवकर पूर्ण करण्यासाठी ठेकेदाराला नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी दिली. २०२७च्या सुरुवातीला नव्या बंगल्यात प्रवेश करण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

महापालिकेच्या आरक्षित भूखंडावर, रिजन्सी अँटिलिया संकुल परिसरात हा बंगला उभारण्यात येत आहे. आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन सहाय्यक संचालक नगररचना ललित खोब्रागडे, नगररचनाकार विकास बिरारी आणि कनिष्ठ अभियंता संजय पवार यांनी एक हजार ८३६ चौरस मीटर क्षेत्रफळात बंगल्याचा आराखडा तयार करून मंजूर केला होता. या प्रकल्पासाठी दोन कोटी ६५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

काही महिन्यांपूर्वी अतिरिक्त आयुक्त डॉ. धीरज चव्हाण यांनी बांधकामाची पाहणी करून कामाचा आढावा घेतला होता. त्यानंतर १२ ऑक्टोबरला आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी शहर अभियंता नीलेश शिरसाठे, उपअभियंता संदीप जाधव, कनिष्ठ अभियंता हर्षद प्रधान आणि सुयश बांगर यांच्यासह प्रत्यक्ष स्थळपाहणी केली.

बंगल्याचे बांधकाम लवकर पूर्ण व्हावे, यासाठी प्रशासनाने आता हालचाली सुरू केल्या आहेत. कामातील दिरंगाई दूर करून प्रकल्पाला गती देण्यासाठी ठेकेदाराला नोटीस बजावण्यात येणार आहे. त्यामुळे दोन दशकांहून अधिक काळ रखडलेला हा प्रकल्प नव्या वर्षाच्या सुरुवातीला पूर्ण होणार का, याकडे महापालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dussehra Shopping: आज दसरा ;वाहन, सोने, गृह, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे खरेदीवर ग्राहकांचा भर १,२०० कोटींची उलाढाल अपेक्षित

Latest Marathi News Live Update : रावण दहनाच्या कार्यक्रमाला दिल्लीच्या रामलीला मैदानात PM मोदींची हजेरी

Dussehra 2026: खंडेनवमी आणि दसरा यात नेमका काय फरक? शस्त्रपूजा नक्की कोणत्या दिवशी करावी?

Dussehra History : छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात दसरा कसा साजरा व्हायचा? इतिहासातील रंजक गोष्टी!

Diwali Bonus Rules: दिवाळीला कंपनीने बोनस देणं बंधनकारक? बोनस देत नसेल तर काय करायचं? पाहा, कायदा काय सांगतो

SCROLL FOR NEXT