मुंबई

पूर्णेकर हत्येसाठीचे पिस्तुल उत्तर प्रदेशातून खरेदी

CD

हत्येसाठी पिस्तुलाची
उत्तर प्रदेशातून खरेदी
टल्ली आणि पपलूने १५ हजारांना पिस्तुले घेतली

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २० : शिवसेनेचे (ठाकरे गट) विभागप्रमुख प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेले पिस्तूल उत्तर प्रदेशातून खरेदी करण्यात आल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे. प्रयागराज येथून अटक करण्यात आलेले संतोष कनोजिया उर्फ टल्ली आणि अमितसिंग उर्फ पपलू यांनी २०२१ मध्ये प्रत्येकी १५ हजार रुपये देऊन पिस्तुले खरेदी केल्याचे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, हत्येसाठी वापरण्यात आलेले दुसरे पिस्तूल आणि तीन चॉपरचा शोध अद्याप पोलिसांकडून सुरू आहे.
पूर्णेकर यांच्यावर गोळीबार केल्यानंतर चॉपरने प्राणघातक हल्ला केला गेला. त्यामध्ये पूर्णेकर यांचा मृत्यू झाला. टल्ली आणि नितेश पवार यांनी गोळीबार केला आणि पपलू आणि निखिल यादव यांनी चॉपरने वार केल्याचे उघड झाले. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून, तिघे न्यायालयीन कोठडीत आहेत, तर दोघे पोलिस कोठडीत असून, त्यांची चौकशी सुरू आहे.
टल्लीच्या गावाकडे जमिनीचा वाद होता, तर पपलूने गावातील वादविवादामुळे उत्तर प्रदेशातून पिस्तुले विकत घेतल्याचे सांगितले, अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली. त्यानंतर ही शस्त्रे पूर्णेकर यांच्या हत्येशी जोडली गेली.
या हत्येसाठी वापरण्यात आलेल्या पिस्तुलांपैकी एक पिस्तूल पोलिसांनी कर्नाळा अभयारण्य परिसरातून हस्तगत केले आहे, मात्र दुसरे पिस्तूल अद्याप सापडलेले नाही. तसेच, हत्येत वापरण्यात आलेले तीन चॉपर जप्त करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. २०२१ मध्ये उत्तर प्रदेशातून खरेदी करण्यात आलेली पिस्तुले पूर्णेकर यांच्या हत्येपर्यंत कशी पोहोचली, त्यांचा वापर कोणी आणि कशा प्रकारे केला, तसेच उर्वरित शस्त्रे कुठे आहेत, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
--------------------
बुधवारी राजेंद्र शिंदेंची चौकशी
शिंदे सेनेच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचे पती राजेंद्र शिंदे यांना पोलिसांनी पाचव्यांदा बुधवारी (ता. २१) चौकशीला बोलावले आहे. आतापर्यंत चार वेळा बोलावून पोलिसांनी राजेंद्र शिंदे यांची २९ तास चौकशी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arabian Sea Low Pressure Area : नैऋत्य अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढणार; पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात पावसाचा येलो अलर्ट

Supreme Court : २२ वर्षे खटला चालला, तरी आरोपी तुरुंगाबाहेर! सर्वोच्च न्यायालय हायकोर्टावर संतापले; आता थेट आत्मसमर्पणाचे आदेश!

Crime News: दांडिया उत्सवात जुन्या वादाचा भडका; चाकूहल्ल्यात बाप-लेकाचा मृत्यू, दोघे जखमी

INDW vs ZIMW 3rd T20I: भारताचा दणदणीत विजय; हरमनप्रीत, शफाली वर्माची फटकेबाजी; झिम्बाब्वेविरुद्धची मालिका ३-० ने खिशात

Cheesy Popeye Poppers Recipe: बाहेरून कुरकुरीत, आतून चीजने भरलेले; पालक आणि काळ्या चण्यांपासून बनवा झटपट स्नॅक्स

SCROLL FOR NEXT