मुंबई

हिंदू काळजीवाहकाला दत्तक घेण्यासाठी पारसी नागरिकाची याचिका

CD

हिंदू काळजीवाहकाला दत्तक घेण्यासाठी पारसी नागरिकाची याचिका

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २० : आपल्या हिंदू काळजीवाहकाला दत्तकपुत्र म्हणून स्वीकारण्यासाठी एका निवृत्त प्राध्यापक आणि स्त्रीरोगतज्ज्ञ असलेल्या पारसी ज्येष्ठ नागरिकाने उच्च न्यायालयात याचिका केली आहे. या याचिकेची दखल घेऊन उच्च न्यायालयाने ज्येष्ठ वकील अस्पी चिनॉय यांची न्यायालयीन मित्र (अमायकर क्यूरी) म्हणून नियुक्ती केली.

दीर्घकाळापासून ओळखीच्या आणि हिंदू धर्मीय काळजीवाहकाला दत्तक घेण्याचा अधिकार न्यायालयाने आपल्याला द्यावा, अशी प्रमुख मागणी  ९० वर्षीय बोमसी वाडिया यांनी वरिष्ठ  वकील सुरेश मानेंमार्फत केलेल्या याचिकेतून केली आहे. त्या याचिकेवर नुकतीच मुख्य न्या. महेश चंद्र त्रिपाठी आणि न्या. अद्वैत सेठना यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. त्या वेळी हे प्रकरण पारशी समाजाशी संबंधित असल्याने कायदेशीर बाजूंचा अभ्यास करण्यासाठी चिनॉय यांनी कायदेशीर प्रश्नांचा अभ्यास करावा, अशी विनंती न्यायालयाने केली. त्यावर चिनॉय यांनी न्यायालयाला सहकार्य करण्याची तयारी दर्शवली, त्याची खंडपीठाने पुढील सुनावणी १४ डिसेंबरला ठेवली आहे.

प्रकरणाची पार्श्वभूमी
डॉ. बोमसी वाडिया यांनी त्यांची देखभाल करणारे राजीव झा यांना मुलगा म्हणून दत्तक घेण्याची परवानगी मागितली आहे. झा हे १९९९ पासून वाडिया यांच्यासोबत राहत असून, त्यांची देखभाल करतात. वाडिया यांनी इच्छापत्रासह विविध कागदपत्रे झा यांच्या नावे केली आहेत. ऑगस्ट २०२५ मध्ये निबंधकाने दत्तक विधानाच्या दस्ताची नोंदणी करण्यास नकार दिला होता. त्यामुळे वाडिया यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन दत्तक विधानाची नोंदणी करण्याचे निर्देश आणि आपल्या पसंतीच्या प्रौढ व्यक्तीला दत्तक घेण्याचा अधिकार घोषित करण्याची मागणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tiger Shroff Car Firing : टायगर श्रॉफ प्रकरणात नवा ट्विस्ट, राधा अन् बबिता दिल्लीहून मुंबईला आल्या अन्...

Karad Kolhapur Naka Flyover Accident : कराडच्या कोल्हापूर नाक्यावरील उड्डाण पुलावर काळाचा घाला! चौघांचा जागीच मृत्यू; तिघेजण जखमी, मागून ट्रकला स्कार्पिओची जोरदार धडक

Arabian Sea Low Pressure Area : नैऋत्य अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढणार; पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात पावसाचा येलो अलर्ट

Supreme Court : २२ वर्षे खटला चालला, तरी आरोपी तुरुंगाबाहेर! सर्वोच्च न्यायालय हायकोर्टावर संतापले; आता थेट आत्मसमर्पणाचे आदेश!

Crime News: दांडिया उत्सवात जुन्या वादाचा भडका; चाकूहल्ल्यात बाप-लेकाचा मृत्यू, दोघे जखमी

SCROLL FOR NEXT