मुंबई

मुरबाड शहर फटाकेमुक्त करण्यासाठी मनसेचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

CD

मुरबाड फटाकेमुक्त करण्याची मनसेची मागणी

मुरबाड, ता. २१ (वार्ताहर) : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुरबाड शहरात फटाक्यांच्या विक्रीला परवानगी देऊ नये, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मुरबाड नगर पंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन शहर फटाकेमुक्त करण्याची मागणी केली.

मुरबाड शहरात सध्या स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असून, शहर स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी नगर पंचायतीकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. अशा परिस्थितीत दिवाळीदरम्यान फटाक्यांची आतषबाजी झाल्यास ध्वनी आणि वायुप्रदूषणात वाढ होण्याची शक्यता आहे. फटाक्यांच्या धुरामुळे हवेची गुणवत्ता खालावण्याबरोबरच ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि श्वसनविकारांचा त्रास असलेल्या नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. तसेच फटाक्यांमुळे निर्माण होणारा कचरा शहराच्या स्वच्छतेसाठी आव्हान ठरू शकतो.

या पार्श्वभूमीवर मुरबाड शहरात फटाक्यांच्या विक्रीसाठी परवानगी देऊ नये, अशी भूमिका मनसेने निवेदनातून मांडली आहे. तसेच विनापरवाना फटाक्यांची विक्री करणाऱ्यांविरोधात नगर पंचायत आणि संबंधित प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

या वेळी मनसेचे शहराध्यक्ष देवेंद्र जाधव, शहर सचिव कल्पना गायकवाड, शहर संघटक कीर्ती गोहिल यांच्यासह पक्षाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. दिवाळीचा आनंद साजरा करताना पर्यावरणाची काळजी घेण्याची गरजही या निवेदनाच्या माध्यमातून अधोरेखित करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आमचे हात बांधलेले नाहीत, निवडणूक प्रक्रियेत गडबड केल्यास शांत बसणार नाही, सर्वोच्च न्यायालयाची मोठी टिप्पणी!

Admission : राज्यात बी. फार्मसी, फार्म.डी. प्रवेशाच्या चौथ्या फेरीत तीन हजार ६६७ विद्यार्थ्यांना संधी

अमरावतीत पोलीस शिपायाच्या मृत्यूने खळबळ; टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी लिहिली चिठ्ठी, नेमकं काय घडलं?

ST Bus Accident : ओझर-पिंपळगाव महामार्गावर टळली मोठी दुर्घटना; टायर फुटून बस डिव्हायडरवर आदळली

Latest Marathi News Live Update : शेतातून सोयाबीनची २० पाेती लंपास, ४८ हजारांचा माल चोरीला

SCROLL FOR NEXT