मुंबई

कंपाउंडलगत कचऱ्याला आग

CD

वडकुणमध्ये कंपनीलगत कचऱ्याला आग

रासायनिक ड्रम आणि ज्वलनशील साहित्यामुळे धोका

कासा, ता. २१ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील वडकुण औद्योगिक क्षेत्रात निखिल ॲडहेसिव्ह्ज लिमिटेड कंपनीच्या कंपाउंडलगत साचलेल्या कचऱ्याला मंगळवारी सायंकाळी आग लागली. कचऱ्यात रासायनिक ड्रम, प्लॅस्टिक, बादल्या आणि अन्य ज्वलनशील साहित्य असल्याने आग भडकण्याची भीती निर्माण झाली होती, मात्र डहाणू नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणल्याने संभाव्य मोठी दुर्घटना टळली.
सायंकाळी ४ वाजून ६ मिनिटांनी आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी रवाना झाले. अवघ्या नऊ मिनिटांत जवान घटनास्थळी पोहोचले. कंपनीच्या मागील बाजूस साचलेल्या कचऱ्याला आग लागल्याचे निदर्शनास आल्यानंतर जवानांनी तातडीने पाण्याचा मारा सुरू करून आग विझवली. कचऱ्यातील ज्वलनशील साहित्यामुळे आग पसरण्याचा धोका लक्षात घेऊन जवानांनी खबरदारी घेतली.

दरम्यान, कंपनीच्या मागील बाजूस काही मुले फटाके फोडत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. त्यामुळे फटाक्यांमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे, मात्र आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेत किती नुकसान झाले, याचीही माहिती मिळू शकलेली नाही.या घटनेमुळे औद्योगिक परिसरातील कचरा व्यवस्थापन आणि सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कंपनीच्या कंपाउंडलगत रासायनिक ड्रम आणि ज्वलनशील साहित्य साचून राहणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे संबंधित यंत्रणेने परिसराची पाहणी करून कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘तुम्ही Gen Z नाही!’ दिल्ली हायकोर्टानं सौरभ दास अन् आशुतोष रांका यांना सुनावलं; फ्रान्समधील जाळपोळीच्या घटनांचाही केला उल्लेख...

केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या घरातूनच SIR ला विरोध? २३ ऑक्टोबरला होणाऱ्या आंदोलनात पती परकला प्रभाकर होणार सहभागी

‘या घरात तुझ्या कार्यासाठी येईन असं वाटलं नव्हतं…’ नाना पाटेकरांच्या पुतण्याची पोस्ट चर्चेत; फार्म हाऊसमधील फोटो व्हायरल

Latest Marathi News Live Update : चार ते पाच महिन्यांत देशात काहीतरी मोठं घडणार, राज ठाकरेंचा दावा

Shark Tank USA: भारतीय तरुणाचा अमेरिकेत डंका! फक्त 2 चमच्यांच्या आयडियासाठी मिळाली ₹3.3 कोटींची ऑफर

SCROLL FOR NEXT