मुंबई

कष्टकरी महिलांसाठी आरोग्याची थाळीचा उपक्रम

CD

कष्टकरी महिलांसाठी आरोग्याची थाळीचा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : घरकाम, बांधकाम, फेरीविक्री तसेच लघुउद्योगांमध्ये काम करणाऱ्या महिलांना दिवसभर शारीरिक कष्ट करावे लागतात, मात्र वेळ आणि आर्थिक अडचणींमुळे त्यांच्या स्वतःच्या आहाराकडे अनेकदा दुर्लक्ष होते, ही बाब लक्षात घेऊन भांडुप परिसरात सुमारे १०० कष्टकरी महिलांना संतुलित आहार आणि पोषणाबाबत बुधवारी (ता. २१) मार्गदर्शन करण्यात आले.

‘सेहत की थाली’ या उपक्रमांतर्गत श्यामनगर, शंकरनगर आणि भांडुप पूर्व परिसरातील महिलांशी संवाद साधण्यात आला. कमी खर्चात आहार अधिक पौष्टिक कसा करता येईल, याबाबत त्यांना माहिती देण्यात आली. डाळी, सोयाबीन, शेंगदाणे, भाजलेले चणे आणि हंगामी पालेभाज्या यांसारख्या सहज उपलब्ध पदार्थांतून प्रथिने, लोह आणि जीवनसत्त्वे मिळू शकतात, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कडधान्यांना मोड आणणे, धान्य-कडधान्यांचा एकत्रित वापर आणि हंगामी भाज्यांचा आहारात समावेश करण्याच्या सूचना देण्यात आल्या. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-५नुसार, देशातील १५ ते ४९ वर्षे वयोगटातील ५७ टक्के महिला रक्तक्षयाने ग्रस्त आहेत. त्यामुळे विशेषतः शारीरिक कष्ट करणाऱ्या महिलांच्या आहारातील लोह आणि प्रथिनांचे प्रमाण वाढविणे महत्त्वाचे ठरते, या उपक्रमात मुंबई शहराच्या सहाय्यक कामगार आयुक्त राजश्री पाटील यांनीही सहभाग घेतला. कष्टकरी महिलांच्या आरोग्याकडे कुटुंबाच्या गरजांइतकेच लक्ष देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. सात्त्विकदान फाउंडेशनतर्फे आयोजित या कार्यक्रमात महिलांना अन्नसहाय्याबरोबरच आहाराचे नियोजन, पोषणविषयक गैरसमज आणि कमी खर्चातील पौष्टिक पर्याय याबाबत माहिती देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elon Musk: अंतराळात डेटा सेंटर, जमिनीवर एआयचा विस्तार! काय आहे एलॉन मस्क यांचा जगाला धडकी भरविणारा मास्टर प्लॅन?

आमचे हात बांधलेले नाहीत, निवडणूक प्रक्रियेत गडबड केल्यास शांत बसणार नाही, सर्वोच्च न्यायालयाची मोठी टिप्पणी!

Soybean Farm Fire : दुष्काळात कष्टाने जगवलेले पाच एकरवरील सोयाबीन जळून खाक; जाणीवपूर्वक आग लावल्याचा शेतकऱ्याचा संशय

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

अमरावतीत पोलीस शिपायाच्या मृत्यूने खळबळ; टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी लिहिली चिठ्ठी, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT